मैत्री तोडली म्हणून सांगलीत युवकाला बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

By शीतल पाटील | Updated: April 5, 2023 19:38 IST2023-04-05T19:37:58+5:302023-04-05T19:38:14+5:30

सांगली : मैत्री तोडल्याच्या कारणातून सहा जणांनी युवकास बेदम मारहाण केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात जखमी ऋषिकेश संतोष ...

A young man was brutally beaten in Sangli for breaking friendship | मैत्री तोडली म्हणून सांगलीत युवकाला बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

मैत्री तोडली म्हणून सांगलीत युवकाला बेदम मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

सांगली : मैत्री तोडल्याच्या कारणातून सहा जणांनी युवकास बेदम मारहाण केली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात जखमी ऋषिकेश संतोष वनखडे (वय २५, रा. कुपवाड, सांगली) याने फिर्याद दिली आहे. ही घटना काल, मंगळवारी, (दि. ४) पत्रकारनगर येथील वाहन बाजारात घडली.

पोलिसांनी संशयित प्रवीण रामा शितोळे, गौरव कांबळे (रा. दोन्ही चाणक्य चौक, कुपवाड), आशिष उत्तम कांबळे (रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड), सुफियान शेख (रा. कुपवाड), रुद्रप्रताप कारंडे (रा. बजरंगनगर, सांगली) आणि गणेश नावाच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती अशी की, फिर्यादी ऋषिकेश वनखडे हा त्याचा मित्र विश्वजीत काकडे याच्यासमवेत जुन्या वाहनाचा व्यवहार करण्यासाठी पत्रकारनगर येथील वाहन बाजारात गेला होता. दरम्यान, तेथे संशयीत सहाजण आले आणि त्यांनी ऋषिकेशला, आमच्याशी मैत्री का तोडलीस, याचा जाब विचारला.

यावेळी झालेल्या वादावादीतून संशयितांनी ऋषिकेशला सिमेंटच्या विटेने मारहाण करून जखमी केले. विश्वजीत हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: A young man was brutally beaten in Sangli for breaking friendship