दुर्गामाता ज्याेत आणताना वाहनातून पडल्याने उमदीचा तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 13:35 IST2022-09-27T13:34:37+5:302022-09-27T13:35:08+5:30
उमदी येथील काही तरुण नवरात्राेत्सवासाठी दुर्गामाता ज्याेत आणण्यासाठी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे गेले हाेते.

दुर्गामाता ज्याेत आणताना वाहनातून पडल्याने उमदीचा तरुण जागीच ठार
जत : नवरात्रीसाठी तुळजापूरहून दुर्गामाता ज्योत घेऊन येत असताना वाहनातून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने उमदी (ता. जत) येथील करणाप्पा दऱ्याप्पा ऐवळे (वय २२) हा तरुण जागीच ठार झाला. कर्नाटकातील हलसंगी फाट्यावर ही साेमवारी सकाळी ही घटना घडली.
उमदी (ता. जत) येथील काही तरुण नवरात्राेत्सवासाठी दुर्गामाता ज्याेत आणण्यासाठी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे गेले हाेते. गावात माेलमजुरी करणारा करणाप्पा ऐवळे हाही त्यांच्यासाेबत गेला हाेता. ज्याेत घेऊन तुळजापूर - सोलापूर पुढे कर्नाटकातील झळकी- चडचण- उमदी या मार्गे सर्वजण उमदीस परतत हाेते.
परत येत असताना कर्नाटकातील झळकी ते चडचणदरम्यान असलेल्या हलसंगी फाट्यावर अचानक ताेल गेल्याने करणाप्पा वाहनावरुन थेट रस्त्यावर पडला. वर्मी मार लागल्याने जागीच त्याचा मृत्यु झाला. देवीच्या उत्सवासाठी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.