Sangli Crime: मैत्री करुन घेतली आक्षेपार्ह छायाचित्रे अन् चित्रफीत, धमकी देत महिलेवर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:20 IST2023-04-25T17:19:35+5:302023-04-25T17:20:18+5:30
महिलेच्या पतीला मोबाइलवर छायाचित्र पाठविले

Sangli Crime: मैत्री करुन घेतली आक्षेपार्ह छायाचित्रे अन् चित्रफीत, धमकी देत महिलेवर केला बलात्कार
सांगली : शहरातील एका रुग्णालयात काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करीत तिची आक्षेपार्ह छायाचित्रे, चित्रफीत घेत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी संदीप बबन जाधव (रा. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप जाधव व संबंधित महिलेची २०१८ पासून मैत्री आहे. या काळात त्याने तिचे काही आक्षेपार्ह छायाचित्र व चित्रफीत घेतली होती. ही छायाचित्रे नातेवाइकांना पाठवू, अशी धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला.
१९ एप्रिल २०२३ रोजी त्याने महिलेच्या पतीला मोबाइलवर छायाचित्र पाठविले. पतीने महिलेला जाब विचारला असता तिने हकीकत सांगितली. अखेर तिने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. अद्याप संशयिताला अटक करण्यात आलेली नाही.