शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये बुडाले १ कोटी; शेअर ट्रेडरचे केले अपहरण, जयसिंगपूरच्या चौघांसह नऊ जणांवर सांगलीत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:41 IST

सांगली : शेअर मार्केटमध्ये बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सांगलीतील ...

सांगली : शेअर मार्केटमध्ये बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत सांगलीतील शेअर ट्रेडर्सचा व्यवसाय करणाऱ्या अंजूम जहांगीर लांडगे (वय ४८, ओंकार अपार्टमेंट, लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) यांचे पिस्तुलाच्या धाकाने अपहरण केल्याची फिर्याद त्यांनी नोंदवली आहे. त्यानुसार संशयित फैजल डांगे, रफीक डांगे, मुज्जमिल डांगे, बबलू डांगे (रा. जयसिंगपूर) व सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अनोळखी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.फिर्यादी अंजुम लांडगे यांचा शेअर्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. संशयित सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अन्य चौघांनी अंजुम यांना कोल्हापूर रस्त्यावरील ओ-नेस्ट नावाच्या हॉटेलसमोरून दि.२२ रोजी जबरदस्तीने मोटारीत बसवून पिस्तूलचा धाक दाखविला. मोटारीतून जयसिंगपूर येथील डायमंड हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका खोलीत आणले. तेथे संशयित फैजल डांगे, रफीक डांगे, मुज्जमिल डांगे, बबलू डांगे यांनी फिर्यादी अंजुम यांना, आमचे बुडालेले १ कोटी ६० लाख रुपये दे, नाहीतर तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून लाकडी दांडके आणि पिस्तुलाने मारहाण केली. फैजल याने २५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच सोहेल याने अंजुम यांच्या मोबाइलच्या माध्यमातून एक हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचे यूएसडी कोणत्यातरी अकाउंटवर ट्रान्सफर केले. तसेच प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये दे, नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी अंजुम यांना सांगलीत सोडून दिले. तसेच त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेले.या प्रकारानंतर अंजुम यांनी दि.२३ रोजी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीshare marketशेअर बाजारCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस