शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

घोणस अळीच्या दंशाने माणूस मरतो? जाणून घ्या काय आहे नेमका प्रकार

By संतोष भिसे | Updated: September 23, 2022 14:19 IST

आता मात्र जणू ती शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलीय.

संतोष भिसेसांगली : नाव घोणस अळी असले म्हणून ती घोणस सापासारखी विषारी अजिबात नाही. समाजमाध्यमांवरुन कोणीतरी अफवेची पुडी सोडली आणि पाहता पाहता तिने महाराष्ट्र व्यापला. एरवी अंड्यातून बाहेर पडून महिना-दीड महिन्यात पतंगात रुपांतर होणारा हा सुरवंट. त्यानंतर शांतपणे जीवनयात्रा संपविणाऱ्या या अळीला समाजमाध्यमांनी भलतेच ग्लॅमर मिळवून दिले आहे. अक्षरश: तिने धुमाकूळ घातलाय.गेल्या ५०-१०० वर्षांत तिच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हते. आता मात्र जणू ती शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलीय. तिच्या प्रतिकारासाठी काय करायचे याचे सल्ले देणाऱ्या स्वयंघोषित संशोधकांचा आणि सल्लागारांचा महापूर आला आहे. शास्त्रीय आणि सुयोग्य वैद्यकीय माहिती न घेता सरसकट विषारी रासायनिक औषधे मारा किंवा कीड पडलेले झाड तोडा असे फुटकळ आणि मूर्खपणाचे सल्ले दिले जात आहेत. पण जातीचा शेतकरी तिच्याविषयी जाणून आहे. शेतकऱ्यासाठी घोणस अळी नवीन नाही.  काय आहे घोणस अळी?

फुलपाखरे आणि पतंग यांच्या अंडी, अळी/सुरवंट, कोष आणि प्रौढ अशा चार जीवनावस्था असतात. अळी किंवा सुरवंटाच्या अवस्थेतून जाताना स्वसंरक्षणासाठी त्यांना निसर्गाशी मिळते जुळते रंग घ्यावे लागतात, किंवा शत्रूच्या त्वचेला दाह, जळजळ होईल असे काटे, केस अंगावर घ्यावे लागतात. सध्या ज्याची चर्चा सुरू आहे, ते स्लग माऊथ प्रजातीच्या पतंगाचे सुरवंट आहेत. त्यांचे भडक रंग हेच आपल्याला सावधानतेचा इशारा देत असतात.लिंब, चिक्कू, आंबा, गवत, ऊस आदी वनस्पतींवर जीवनचक्र पूर्ण करतात. ते चावत नाहीत, तर त्यांच्या त्वचेवरील उपसून येणाऱ्या केसांना स्पर्श होताच त्वचेवर जळजळ किंवा दाह निर्माण होतो. अळीच्या त्वचेत केस सैल जोडलेले असतात. कोणीतरी स्पर्श करताच लगेच त्याच्या त्वचेत घुसतात. त्यामुळे शरीरावर बारीक लाल पुरळ उठतात. खाज सुरु होते. लाल चट्टे, जळजळ असा त्रास सुरु होतो. अनेकदा शेतकरी अशा प्रसंगी झेंडूचा पाला चुरडून त्याचा रस लावतात, १५-२० मिनिटांत दाह शमतो. आग होणाऱ्या भागावर बर्फाने शेकल्यामुळेही आराम मिळतो असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.अळीचा स्पर्श झालेल्या भागावर चिकटपट्टी चिकटवून जोरात खेचल्यानेही त्वचेत रुतलेले केस निघून जातात. अर्थात, ज्यांना दमा असेल, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. त्यांनी जवळच्या रुग्णालयात जाऊन प्रतिबंधात्मक उपचार घेणे इष्ट राहते. औषधेही वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावीत. शेतात काम करताना जागेची नीट पाहणी करून घ्यावी. अंग पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत.

अळीचे नाव घोणस असले, म्हणून ती सापासारखी तीव्र विषारी आहे असे मानायचे कारण नाही. स्वत:च्या संरक्षणासाठी प्रत्येक प्राणी निसर्गत: काहीतरी जुगाड करतो, तोच प्रकार आहे. ही अळी अजिबात विषारी नाही. ती दंशही करत नाही. तिच्या दंशाने माणूस मेल्याचे एकही उदाहरण महाराष्ट्रात नाही. आता अफवा थांबवाव्यात. - अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली. 

घोणस अळीविषयी घाबरण्याचे कारण अजिबात नाही. तिला स्पर्श होऊ नये याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ती विषारी नाही. तिच्या शरिरावरील केस टोचल्याने दंश झाल्याची भावना होते. तिच्या स्पर्शाने माणूस मरत नाही. - डॉ. मनोज माळी, महात्मा फुले कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, सांगली

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी