Sangli: थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोराची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:38 IST2023-09-29T15:37:01+5:302023-09-29T15:38:41+5:30

मालमोटार चालक महांतेश सुभाष करीकब्बी याने मोटारचालक माने याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली

A one and a half month old baby died in an accident in Jat | Sangli: थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोराची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

Sangli: थांबलेल्या ट्रकला कारची पाठीमागून जोराची धडक, अपघातात दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू

जत : विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर मोटारीने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दीड महिन्याचे बाळ मरण पावले. जतपासून पाच किलोमीटरवर साखर कारखान्याजवळ मंगळवारी रात्री उशिरा दुर्घटना घडली.

प्रेम सचिन सुतार (वय ४५ दिवस, रा. उंटवाडी, ता. जत) असे तान्हुल्याचे नाव आहे. १८ चाकी मालट्रक (क्रमांक केए २८ डी ७२११) हा रस्त्याकडेला थांबला होता. चालक-वाहक जेवणासाठी गेले होते. त्यावेळी मोटार (क्रमांक एमएच ०९ बीबी ८२५५) ट्रकला मागून जोराची धडक दिली. त्यामध्ये मोटारीतील प्रेमच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात तो जागीच मरण पावला. 

चालक योगेश गोपाळ माने (रा. खोजानवाडी, ता. जत) हा जखमी झाला. प्रेमची आई अश्विनी सुतार हिला कोणतीही दुखापत झाली नाही. याप्रकरणी मालमोटार चालक महांतेश सुभाष करीकब्बी याने मोटारचालक माने याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. भरधाव वेगाने कार चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: A one and a half month old baby died in an accident in Jat