शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
3
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
4
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
5
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
8
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
9
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
10
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
11
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
12
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
13
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
14
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
15
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
16
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
17
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
18
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
19
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
20
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील रेकॉर्डवरील गुंडाची सावर्डेजवळ आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 12:05 IST

खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल; गुंड म्हमद्या नदाफचा साथीदार

पेठवडगाव/ सांगली : खून, खुनी हल्ला, खंडणी, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुंड सागर चंद्रकांत शेंडगे (वय ३३, रा. साई मंदिरजवळ, अभयनगर, सांगली) याने सावर्डे (ता. हातकणंगले) हद्दीतील डोंगरात निर्जनस्थळी विष पिऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत सागर हा सांगलीतील कुप्रसिद्ध गुंड म्हमद्या ऊर्फ महंमद नदाफ याचा साथीदार म्हणून परिचित होता. सांगलीतील संजयनगर येथे नुकतेच उद्योजकाकडून १२ लाखांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात सागरचे नाव निष्पन्न झाले होते. त्याचा शोध सुरू असतानाच त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हातकणंगले तालुक्यातील सावर्डे-नरंदे रस्त्यावर पुलाजवळ डोंगराकडे जाणारा रस्ता आहे. गुरुवारी या रस्त्याने काही मेंढपाळ मेंढ्या चरण्यासाठी गेले होते. सायंकाळी झुडपातून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी पाहणी केली तेव्हा साधारण ३५ वयाच्या तरुणाचा सडलेला मृतदेह दिसला. त्यांनी पेठवडगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा मृतदेहाजवळ शेतात पिकांवर फवारणीसाठीचे औषध मिळाले. तसेच दुचाकी (एमएच१० ईसी ३४४०) मिळून आली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. शुक्रवारी नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहांची ओळख पटवली. मृताचे नाव सागर शेंडगे असल्याचे स्पष्ट झाले. तो जवळपास १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले.मृत सागर शेंडगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुंड म्हमद्याबरोबर त्याने काही वर्षांपूर्वी मनोज माने याचा खून केला होता. याप्रकरणात म्हमद्याच्या टोळीला मोक्का लावण्यात आला होता. गेली काही वर्षे टोळी कारागृहातच होती. जानेवारी महिन्यात म्हमद्या जामिनावर मुक्त झाला. त्याबरोबर सागरही जामिनावर सुटला होता. परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. संजयनगरमधील उद्योजकाकडून १२ लाखांची खंडणी उकळली होती. त्यानंतर तो पसार होता. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच आश्चर्य व्यक्त होत आहे. पेठवडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र गायकवाड तपास करत आहेत.

खंडणीच्या गुन्ह्यात शोधसांगलीतील उद्योजक अक्तरमिया शेख यांना पुण्यातील पार्टीने खुनाची सुपारी घेतल्याचे सांगून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १२ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार नुकतेच घडला होता. याप्रकरणी शेख यांनी यासीन इनामदार (रा. सांगली) याला संजयनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत सागर शेंडगे याचे नाव निष्पन्न झाले. संजयनगर पोलिस त्याचा शोध घेत असतानाच शुक्रवारी त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस