Sangli: ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून शेतकऱ्याची ८ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:22 IST2025-10-27T15:22:30+5:302025-10-27T15:22:50+5:30
सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून ८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार ...

Sangli: ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून शेतकऱ्याची ८ लाखांची फसवणूक
सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यास ऊस तोडणी मजूर पुरवतो सांगून ८ लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत भाऊसाहेब लक्ष्मण देसाई (वय ६१) यांनी संशयित अंकुश मधुकर गेजगे (३५), दिलीप मधुकर गेजगे (२५) या दोघांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भाऊसाहेब देसाई यांना २०२४-२५ च्या गळीत हंगामात ऊसतोड मजुरांची आवश्यकता होती. संशयित दोघा भावांनी मजूर पुरवतो असे सांगून १९ एप्रिल २०२५ पासून वेळोवेळी आरटीजीएस व रोख ११ लाख ७५ हजार रुपये घेतले. त्यांच्यात १२ जून २०२४ रोजी नोटरी व दस्त करार झाला. त्यानंतर व्यवहारातून देसाई यांनी संशयितांना ५ लाख २५ हजार रूपये दिले. संशयित दोघांनी मजूर पुरवून ८ लाख ६० हजार रुपये परतफेड केली.
परंतु उर्वरित रकमेबाबत वेळोवेळी विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली. सतत पाठपुरावा करूनही ८ लाख ४० हजार रूपये परत न करता फसवणूक केली म्हणून देसाई यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.