Sangli Crime: पाच लाख दे, नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची दिली धमकी; तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:13 IST2025-04-30T14:13:34+5:302025-04-30T14:13:57+5:30
सांगली : पाच लाख खंडणी दे, नाही तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्याचा प्रकार माधवनगर (ता. मिरज ...

Sangli Crime: पाच लाख दे, नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची दिली धमकी; तिघांवर गुन्हा
सांगली : पाच लाख खंडणी दे, नाही तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देण्याचा प्रकार माधवनगर (ता. मिरज ) येथे घडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. २५) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी नवीन राजेंद्र शहा (वय ४४, रा. माधवनगर) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सनोबर खान ( रा. माधवनगर), अशोक कसबे यांच्यासह तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नवीन शहा हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर परिसरातील सोमवार पेठ परिसरात राहतात. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयितांनी संगनमत करून नवीन यांच्या भावाच्या मोकळ्या प्लॉटमध्ये जबरदस्तीने घुसखोरी केली. मेहुल यांना ''रिकामा प्लॉट देऊन टाक, नाही तर आताच्या आता पाच लाख रुपयांची खंडणी दे'' अशी धमकी दिली. ''नाही तर तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो'' असेही धमकावले.
नवीन व भाऊ हर्षल यांनी प्लॉट देण्यास नकार दिला असता शिवीगाळ करत कसबे याने बेदम मारहाण केली. घडलेल्या या घटनेनंतर नवीन यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता ३०८ (२), ३०८ (३), ३२९ (३), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३ ५१ (२) नुसार गुन्हे दाखल केले.