शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident News: नशेत बेदरकारपणे मोटार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा, दोन चिमुकल्यांसह १५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:53 IST

जमावाने केलेल्या हल्ल्यात चालक जखमी

सांगली : दारूच्या नशेत बेदरकारपणे मोटार चालवून १५ जणांना जखमी करत पाच मोटारी, दोन दुचाकींचे नुकसान करणाऱ्या चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिस लखन होवाळे यांनी फिर्याद दिली. जमावाने केलेल्या हल्ल्यात पांचाळ जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.मोटारचालक पांचाळ हा पुणे येथून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास त्याने नशेत आपल्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच १४ एलबी ४९००) चालवली. पटेल चौक ते गणपती मंदिर, टिळक चौक या मार्गावर त्याने वाहनांना धडक देत कृष्णामाई महाेत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणुकीस असलेल्या चार पोलिसांसह १५ जणांना धडक देऊन जखमी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.चालक पांचाळ याने नशेत बेदरकारपणे मोटार चालवून पाच मोटारींना तसेच दोन दुचाकींना धडक देत मोठे नुकसान केले आहे. टिळक चौकात एका दुचाकीला धडक देऊन त्याची मोटार थांबल्यानंतर संतप्त जमावाने त्याला मोटारीतून बाहेर ओढत मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सुटका करत चालक पांचाळ याला ताब्यात घेतले. उपचारासाठी सिव्हिलमध्ये त्याला दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पांचाळ याने दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे. दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी लखन होवाळे यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अमोल लोहार अधिक तपास करत आहेत.प्रवासी घेऊन सांगलीत आला होताचालक पांचाळ हा पुण्यातून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. प्रवाशांना तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोडणार होता. परंतु, वाटेत त्याने दारू प्यायल्यामुळे प्रवाशांनी त्याला खडसावले होते. सांगलीत प्रथमच आल्यामुळे त्याला रस्ते माहीत नव्हते. पटेल चौकातून त्याने बेदरकारपणे मोटार चालवत वाहनांसह पोलिसांना धडक दिली. जमावाने त्यास पकडल्यानंतर वाहनातील प्रवासी निसटले.जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशचालक पांचाळ याने १५ जणांना धडक देत जखमी केले. यात अमया राजेंद्र खोत (वय ७) व वंदन सुनील फराटे (वय ३) या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Driver Injures 15, Including Children, in Sangli Accident

Web Summary : A drunk driver in Sangli injured 15 people, including two children, and damaged multiple vehicles. The driver, Pranket Panchal, was arrested after being assaulted by an angry mob. Police are investigating the incident, which occurred near Tilak Chowk during a festival.