शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

सांगलीतील सराफाची २३ लाखाला फसवणूक, पाचजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:31 IST

शहर पोलिसांत तक्रार

सांगली : शहरातील एका सराफाकडून सोन्याचे दागिने घेऊन त्याचे पैसे न देता २३ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमन शहाबुद्दीन पखाली (वय २५, रा. गवळी गल्ली) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वसीम शेख (रा. ५० फुटी रोड, गादी कारखान्याजवळ, शामरावनगर), त्याचा भाऊ मोसीन शेख, मित्र तेजस माने व राज सोनावले, सराफ धनाजी कदम या पाचजणांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पखाली यांचे शामरावनगरमध्ये एस. पी. ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सराफी व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीचा वसीम शेख हा पत्नी, भावासह दुकानात आला. त्याने सोन्याचे लोटस्, चेन, सोन्याची तेंडुलकर चेन, अंगठी, कानातील टाॅप्स असा ११ लाख ८० हजार रुपयांचे, तर त्याचा भाऊ मोमीन याने चेन, लोटस चेन, कानातील रिंग असा ५ लाख ७० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. दागिनेचे पैसे नंतर आणून देतो, असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर १६ एप्रिल २०२५ रोजी वसीम हा त्याचा मित्र तेजस माने व राज सोनावले याच्यासह दुकानात आला. माने याने २ लाख एक हजाराचे, तर सोनावले याने ६ लाख ६ हजाराचे दागिने खरेदी केले. सायंकाळपर्यंत या दागिन्याचे पैसे देतो, असे सांगून वसीम मित्रासह निघून गेला.त्यानंतर फिर्यादी पखाली यांनी वसीमकडे सातत्याने दागिन्याचे पैसे मागितले, पण त्याने काही ना काही कारण देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. या चौघांनीही सोन्याचे दागिने सराफ कट्टा परिसरातील धनाजी कदम यांना विकले. त्यांनी ते दागिने मोडले. या पाचजणांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पखाली यांनी शहर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Jeweler Defrauded of $28,000, Five Booked by Police

Web Summary : A Sangli jeweler was defrauded of ₹23.56 lakhs. Five individuals, including Wasim Sheikh and Dhanaji Kadam, are accused of buying gold jewelry on credit and then selling it without paying, leading to a police investigation and charges of fraud.