शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे ९६२ नवे रुग्ण; १४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ९६२ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रासह पाच ठिकाणी ...

सांगली : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ९६२ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. महापालिका क्षेत्रासह पाच ठिकाणी शंभरावर रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी ६० हजारांचा टप्पा पार केला.

कोरोनाबाधितांची वाढती संख्या शनिवारीही कायम होती. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक १९९ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय आटपाडी १०९, कडेगाव १२८, खानापूर १११ आणि वाळवा तालुक्यात १४२ नवे रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत सध्या ६६१० रुग्ण उपचार घेत असून, त्यातील ११६९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १०४७ जण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, तर १२२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. चिंताजनक रुग्णांच्या संख्येतही शनिवारी वाढ झाली आहे.

प्रशासनाने आरटीपीसीआरअंतर्गत केलेल्या २२८१ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून ६१० जण बाधित आढळले असून, रॅपिड अँटिजनच्या १९०१ जणांच्या तपासणीतून ३८४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यासह सोलापूर ५, कोल्हापूर ८, सातारा ९, कर्नाटक ७, बारामती, दिल्ली आणि पुणे येथील प्रत्येकी एकाला कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ६०२६५

उपचार घेत असलेले ६६१०

कोरोनामुक्त झालेेले ५१७३७

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १९१८

शनिवारी दिवसभरात

सांगली १३४

मिरज ६५

वाळवा १४२

कडेगाव १२८

खानापूर १११

आटपाडी १०९

मिरज तालुका ८०

तासगाव ६७

जत ३८

कवठेमहांकाळ ३६

पलूस २८

शिराळा २४

चौकट

मृत्यूसंख्या १९०० वर

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने शनिवारी ६० हजारांचा टप्पा पूर्ण केला. याशिवाय कोरोनाने झालेल्या मृत्यूसंख्येनेही १९००ची संख्या पार केली आहे.