शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव शहरात आजपासून ७ दिवसांचा जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST

शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. रुग्णसंख्या तीनशेच्या जवळ पोहोचली आहे. वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरत असल्याने दि. २९ ...

शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. रुग्णसंख्या तीनशेच्या जवळ पोहोचली आहे. वाढती रुग्णसंख्या धोकादायक ठरत असल्याने दि. २९ एप्रिल ते ५ मे अखेर शहरातील

दवाखाने, औषध दुकाने, दूध संकलन वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात सात दिवसांचा कडक जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याची माहिती शहर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून देण्यात आली.

कडेगाव नगरपंचायतीमध्ये नगरसेवक, नगरपंचायत प्रशासन, व्यापारी, भाजीविक्रेते व लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, कडेगाव शहर आपत्ती व्यवस्थापन समिती यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

रुग्णालये व औषध दुकाने वगळता अन्य सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सात दिवस बंद राहणार आहेत. तसेच शहरात कोणालाही फिरून भाजीविक्री करता येणार नाही. या कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तेव्हा सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे व स्वतःची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कडेगाव शहर आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.