सांगलीत एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 6 जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 10:33 IST2018-11-10T09:34:25+5:302018-11-10T10:33:12+5:30
एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सांगलीत एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 6 जण अटकेत
सांगली - एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज शहरातील गांधी चौक परिसरातील हा प्रकार आहे. तानाजी दंडगुले असे जाळण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दंडगुले दारू पिण्यासाठी येथील एका दुकानात आले होते. याचवेळेस पाच ते सहा जणांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या खिशातले अडीच हजार रुपयांची रोकड काढून घेतली. मारहाण करणाऱ्यांना विरोध केला असता दंडगुले यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटने दंडगुले गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.