शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पालिकांसाठी ५४१ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: November 11, 2016 23:50 IST

जिल्ह्यात १६१ जागा : नगराध्यक्षपदासाठी २८ उमेदवार; बहुरंगी लढती रंगणार

सांगली : जिल्ह्यातील पाच नगरपालिका व तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३१६ उमेदवारांनी माघार घेतल्याने १६१ जागांसाठी ५४१ उमेदवार रिंगणात असणार आहेत. शिराळा येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, तर जिल्ह्यातील पाच नगरपालिकांतील नगराध्यक्ष पदासाठी २८ उमेदवार लढत देणार आहेत. अर्ज माघारीची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत. तासगाव, पलूस आणि कवठेमहांकाळमध्ये चौरंगी, पंचरंगी लढती होणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी इस्लामपूरला चौरंगी, विटा येथे तिरंगी, पलूस, तासगावला बहुरंगी, तर आष्टा येथे दुरंगी लढत होणार आहे. इस्लामपूर नगरपालिकेसाठी २८ जागांसाठी १२७ अर्ज दाखल करण्यात आले होते. एक जागा बिनविरोध झाल्याने २७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यातील ५४ उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतल्याने आता ७२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार असून, आज ११ पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील, विकास आघाडीचे निशिकांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे विश्वास सायनाकर, एमआयएमचे शाकीर तांबोळी यांच्यात लढत होणार आहे. विटा नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ८३ पैकी २६ उमेदवारांनी माघार घेतल्याने २४ जागांसाठी ५७ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार असून आजी माजी आमदारांत लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी कॉँग्रेसकडून माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या स्नुषा प्रतिभा वैभव पाटील, शिवसेनेकडून आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल अमोल बाबर आणि रासपच्या पूजा नागेश तारळेकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. तासगाव नगरपालिकेत २१ जागांसाठी ८३ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली. तासगावात सर्वच प्रभागात बहुरंगी लढत रंगणार आहे. नगराध्यक्ष पदासाठीही १० जण लढत देणार आहेत. यात प्रामुख्याने अ‍ॅड. संजय सावंत (राष्ट्रवादी), डॉ. विजय सावंत (भाजप) आणि शिवाजी शिंदे (कॉँग्रेस) यांच्यासह इतर उमेदवारात लढत होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी सावंत बंधूंतील लढत लक्षवेधी ठरणार आहे. आष्टा नगरपालिकेतील २१ जागांवर ५४ उमेदवार आता लढत देणार आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १४२ उमेदवारांपैकी ९२ उमेदवारांनी माघार घेतली. सत्ताधारी शहर विकास आघाडी व लोकशाही आघाडीमध्ये थेट लढत होणार असून १२ अपक्षही निवडणूक लढविणार आहेत. नगराध्यक्षपदासाठीही स्नेहा संभाजी माळी व लता अमोल पडळकर यांच्या थेट लढत होणार आहे. पलूस येथे १७ जागांसाठी ८५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. शुक्रवारी ७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. येथे पंचरंगी लढतीचे संकेत मिळाले असून नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. यात राष्ट्रवादी, कॉँग्रेस, भाजपसह इतर पक्ष व अपक्षांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी चुरस जिल्ह्यातील पाच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने लढती चुरशीच्या होणार आहेत. यात प्रामुख्याने इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे विजयभाऊ पाटील व विकास आघाडीचे निशिकांत पाटील यांच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विटा येथे शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्या स्नुषा शीतल बाबर आणि माजी आ. सदाशिव पाटील यांच्या स्नुषा प्रतिभा पाटील यांच्यातील लढत मोठ्या चुरशीची ठरणार आहे. तासगाव येथे अ‍ॅड. संजय सावंत आणि डॉ. विजय सावंत या दोघा बंधूमधील लढतही तितकीच लक्षवेधी ठरणार आहे.