शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पाणी काटकसरीने वापरा; कोयना धरणाच्या दुरुस्तीमुळे सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 15:31 IST

पाटबंधारे विभागाची माहिती : किती दिवस होणार पाण्याचा अपुरा पुरवठा.. वाचा

सांगली : कोयना धरणाच्या स्टिलिंग बेसिनच्या दुरुस्तीमुळे सध्या कोयना धरणातून नदीपात्रात मर्यादित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी नदीवरील ग्राहकांनी पुढील आठ दिवस पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाने केले आहे.जिल्ह्यातील टेंभू, ताकारी व म्हैसाळ या महत्त्वाच्या उपसा सिंचन योजनांसाठी कृष्णा नदीतून पाणी उचलले जाते. या योजनांच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून, तर म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा धरणातून पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.सध्या कोयना धरणाचा जिवंत पाणीसाठा ६४.७४ टीएमसी असून वारणा धरणात १७.७७ टीएमसी साठा उपलब्ध आहे. सध्या कोयना धरणातून केडीपीएच टप्पा १ व २ मधून २१०० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला जात आहे, तर वारणा धरणातून १७७० क्यूसेक्स इतका विसर्ग सोडला जात आहे, त्यापैकी दानोळी बंधाऱ्यावर प्रत्यक्ष सुमारे ८०० क्यूसेक्स पाणी उपलब्ध होत आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढत असताना कोयना धरणाच्या नदी विमोचकातून अतिरिक्त १००० ते १५०० क्यूसेक्स विसर्ग सध्या सोडता येत नाही. कोयना धरणाच्या स्टीलिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून ते १८ मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या तिन्ही योजनांचे पंप मर्यादित संख्येने सुरू ठेवण्यात आले आहेत. सध्या टेंभू योजनेचे १६ पंप म्हणजे सुमारे ५३ टक्के, ताकारी योजनेचे ८ ते १० पंप म्हणजे सुमारे ६३ टक्के, तर म्हैसाळ योजनेचे १३ ते १४ पंप म्हणजे सुमारे ५० टक्के पंप सुरू आहेत.

१८ मार्चनंतर पूर्ण क्षमतेने सिंचन योजना चालू : चंद्रशेखर पाटोळे१८ मार्चनंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर १९ मार्चपासून नदी विमोचकातून १००० ते १५०० क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर एक-दोन दिवसांत टेंभू, ताकारी व म्हैसाळ या योजना पूर्ण क्षमतेने सुरू करून उर्वरित उन्हाळी हंगामात पंप पूर्ण क्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकरी, उद्योग तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना लाभार्थ्यांनी पुढील आठ दिवस पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी केले आहे.

कोयना, वारणा धरणातील पाणीसाठा, विसर्ग स्थिती- कोयना धरण साठा : ६४.७४ टीएमसी- वारणा धरण साठा : १७.७७ टीएमसी- कोयना विसर्ग : २१०० क्युसेक्स- वारणा विसर्ग : १७७० क्युसेक्स

English
हिंदी सारांश
Web Title : Conserve Water: Koyna Dam Repairs Halt 50% Irrigation Pumps

Web Summary : Koyna dam repairs limit water release, impacting irrigation. Tembu, Takari, and Mhaisal schemes face 50% pump shutdowns. Conserve water for the next week.