किसानला ४९ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:24 IST2021-04-11T04:24:57+5:302021-04-11T04:24:57+5:30

पलूस : कुंडल येथील किसान नागरी पतसंस्थेस ढोबळ ४९ लाख ५१ हजारांचा नफा झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल ...

49 lakh profit to the farmer | किसानला ४९ लाखांचा नफा

किसानला ४९ लाखांचा नफा

पलूस : कुंडल येथील किसान नागरी पतसंस्थेस ढोबळ ४९ लाख ५१ हजारांचा नफा झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल शामराव लाड यांनी दिली.

ते म्हणाले, ३१ मार्च २०२१ अखेर संस्थेची वसूल भागभांडवल २४ लाख ४४ हजार इतके असून संस्थेचा स्वनिधी एक कोटी २१ लाख आहे. मार्च २०२१ अखेर एकूण ठेवी १३ कोटी १४ लाख झाल्या असून कर्ज वाटप १० कोटी १४ लाख इतके झाले आहे. संस्थेने वार्षिक आर्थिक उलाढाल एकूण ३९ कोटी १५ लाख एवढी केली आहे. संस्थेची एकूण गुंतवणूक चार कोटी ८१ लाख आहे. तसेच संस्थेचा नेट एन.पी.ए. शून्य टक्के आहे. संस्थेमार्फत सर्व ग्राहकांना एनएफटी, आरटीजीएस, चेक क्लीअरिंग सर्व सेवा मोफत दिल्या जातात. तसेच संस्थेमध्ये एमएसईबीचे अधिकृत बिल भरणा केंद्र पलूस शाखेसह आहे.

यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन विनोद लाड, मार्गदर्शक प्रदीप कस्तुरे, संचालक जितेंद्र जाधव, महारुद्र जंगम, सारंग माने, प्रकाश लाड, बाजीराव पवार, डॉ. श्रीकांत जाधव, एम. एल. पुजारी, संभाजी पवार, नारायण अभ्यंकर, सिंधू थोरबोले, किरण लाड, अनिल सावत, देवानंद खारगे, श्रीरंग सावत, प्रकाश पुजारी, सुखदेव कनुंजे, प्रकाश आवटे, अधिक लाड, विजय कठारे, दत्तात्रय माळी उपस्थित होते.

Web Title: 49 lakh profit to the farmer