शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

गुंड म्हमद्याला ३० दिवसांची मुदत

By admin | Updated: November 26, 2015 00:13 IST

न्यायालयाची नोटीस : हजर न झाल्यास फरार जाहीर करण्यात येणार...

सांगली : संजयनगर व कुपवाड पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित गुंड म्हमद्या नदाफ याला पोलिसांत हजर होण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची मुदत दिली आहे. तशी नोटीसही बुधवारी न्यायालयाने जारी केली. मुदतीत म्हमद्या हजर न झाल्यास त्याला न्यायालयाकडून फरार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली. म्हमद्या नदाफवर त्याचा एकेकाळचा साथीदार मनोज माने याच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. यापूर्वीही त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. मनोज माने खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन हल्लेखारांना अटक केली. मुख्य संशयित म्हमद्या अद्यापही पोलिसांना चकवा देत आहे. त्याच्या शोधासाठी कर्नाटकसह अनेक ठिकाणी पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत. म्हमद्याला मदत करणाऱ्या हितचिंतकांभोवतीही पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. त्याच्या ७० मदतगारांपैकी ३० जणांचे जबाब घेतले आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी सर्वच पातळ्यांवर आघाडी उघडली असून, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपूर्वी म्हमद्याला पोलिसांनी वॉन्टेड म्हणून जाहीर केले आहे. आता संजयनगर व कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार आहे. त्याला फरार जाहीर करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर बुधवारी सुनावणी झाली. न्यायालयाने या दोन्ही गुन्ह्यात म्हमद्याला पोलिसात हजर होण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. हजर झाला नाही तर, त्याला फरार घोषित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)मालमत्तेवर टाच येणारगुंड म्हमद्याची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. आता न्यायालयाने त्याला पोलिसांत हजर राहण्यासाठी मुदत दिली आहे. ही मुदत संपल्यानंतर तो हजर न झाल्यास त्याला फरार घोषित करण्यात येईल. त्यानंतर त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.