मिरज : मिरजेत दोन गटात तणावपूर्ण स्थिती निवळली आहे, मात्र उद्या शुक्रवारी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी बैठक घेत शहरातील मशिदींच्या विश्वस्तशी संवाद साधला. मिरजेत तिसऱ्या दिवशीही पोलिस बंदोबस्त कायम होता. जमावबंदी आदेशाचा भंग प्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या सातजणांना चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे.मंगळवारी रात्री मिरजेत दोन तरुणातील भांडणाचे पर्यावंसन दोन गटात तणावात झाले. यावेळी जमाव शहर पोलिस ठाण्यासमोर जमल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पिटाळले. गुरुवारी तिसऱ्या दिवशीही शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरु होते.मात्र उद्या शुक्रवारी शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस ठाण्यात मोहल्ला कमिटी बैठक झाली. शहरातील मशिदींचे इमाम, धर्मगुरू, विश्वस्त बैठकीत सहभागी होते. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहरात शांतता प्रस्थापित झाली. यापुढेही समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे. सोशल मीडियावर कोणीही वादग्रस्त पोस्ट करु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणताही प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक घुगे यांनी केले. शुक्रवारी संपूर्ण शहरातील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून जमाव जमवून हुल्लडबाजी करणाऱ्या २३ जणांना अटक करण्यात आली. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या सातजणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी सांगितले.वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या नऊ जणांवर कारवाईसांगली : मिरजेतील दोन गटांतील वादाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्रामवर दिशाभूल करणारा संदेश प्रसारित करून स्टेटस ठेवल्याबद्दल ९ तरुणांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. सायबर पोलिसांची समाजमाध्यमावर करडी नजर असून वादग्रस्त पोस्ट, स्टोरी, स्टेटस ठेवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Web Summary : Tension eased in Miraj after clashes. 23 arrested for curfew violation. Police increased security, engaging with religious leaders. Seven face notices for social media posts. Nine others face action for misleading statuses. Peace restored; cooperation urged.
Web Summary : मिरज में तनाव कम हुआ, कर्फ्यू उल्लंघन में 23 गिरफ्तार। पुलिस ने सुरक्षा बढ़ाई, धर्मगुरुओं से संवाद किया। सोशल मीडिया पोस्ट के लिए सात को नोटिस। नौ अन्य को भ्रामक स्टेटस पर कार्रवाई का सामना करना पड़ा। शांति बहाल; सहयोग का आग्रह।