शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: टायर फुटून ट्रॉलीचा कणा तुटला, ट्रॅक्टर ट्रॉली उलटून २३ वारकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 12:36 IST

कवठेमहांकाळ : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका हॉटेलसमोर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने २३ वारकरी ...

कवठेमहांकाळ : रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका हॉटेलसमोर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने २३ वारकरी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याचे सुमारास घडला. या अपघाताची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघातातील जखमी वारकरी कारंदवाडी (ता. वाळवा) परिसरातील आहेत.याबाबत माहिती अशी, कारंदवाडी (ता. वाळवा) येथील वारकरी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला गेले होते. तेथून ते ट्रॅक्टर (एमएच १० डीक्यू ०६७६) मधून परतत असताना कुची येथून काही अंतरावर एका हॉटेलच्यासमोर ट्रॅक्टरचा पुढील टायर फुटला. त्यामुळे ट्रॉलीशी जोडलेला कणा तुटल्याने ट्रॉली उलटली. यामध्ये एकूण २३ वारकरी जखमी झाले.जखमींमध्ये शशिकला प्रकाश जाधव (४६),उज्ज्वला मारुती चव्हाण (४०), पार्वती अंकुश हक्के (८०),सारिका सचिन कणसे (४०), विजया बाबासाहेब जाधव (५०),मंगल महादेव लवटे (५०), अमृता दशरथ रोकडे (१२), विलास बापू आटवडे (५०), वंदना दादासाहेब मानवर (४५), श्रेयश अंकुश हक्के (१०, सर्व रा. कारंदवाडी ता.वाळवा) महेश अंकुश हक्के (१३, रा.आष्टा), आशाताई आनंदराव वळसे (६५ रा. इस्लामपूर), सुनीता वसंत खोत (४५, रा. मिरजवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालय सांगली येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे.तर आदित्य सोमनाथ जाधव (१३), द्रोपदी बाबुराव पवार (५०), अक्काताई प्रकाश कचरे (३८), नंदा जगन्नाथ वाघमोडे (४०, रा. कारंदवाडी), लक्ष्मी रामचंद्र जाधव (६०, रा. वाळवा), मालन लक्ष्मण हक्के (६२, रा. कारंदवाडी), मंगल मच्छिंद्र मुरले (५५, रा. वाळवा), सुमन भानुदास रोकडे (७०), शैला विलास आटवडे (४०), रेखा बाळासाहेब गडदे (५० रा.कारंदवाडी), राजाराम तातोबा खिल्लारे (६२) असे किरकोळ जखमी झाले.स्थानिकांची मदतअपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना शासकीय रुग्णालय सांगलीत हलवले आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन वारकऱ्यांची माहिती घेतली. जखमीमध्ये प्रामुख्याने कारंदवाडी येथील वारकऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात