सांगलीमध्ये आयर्विन पुलाजवळ १५ फूट पाणी, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:30 IST2025-05-27T15:30:39+5:302025-05-27T15:30:56+5:30

शिराळा, वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये दमदार पाऊस

15 feet of water near Irwin Bridge in Sangli, four dams on Krishna River underwater | सांगलीमध्ये आयर्विन पुलाजवळ १५ फूट पाणी, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली 

सांगलीमध्ये आयर्विन पुलाजवळ १५ फूट पाणी, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली 

सांगली : जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. पण सर्वत्र ढगाळ हवामान होते. दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. आयर्विन पुलाजवळ १५ फुटापर्यंत पाणी आले आहे. शिराळा, वाळवा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाची दमदार पाऊस सुरू आहे. गेल्या दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत असून, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यांसह मिरज, पलूस तालुक्यातही गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले आहे. नदी, ओढे, नाले भरून वाहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत.

कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली

जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. वाळवा तालुक्यातील बहे, मिरज तालुक्यातील डिग्रज, सांगली आणि म्हैसाळ, असे चार बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तेथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवली आहे.

गेल्या २४ तासातील पाऊस

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासातील तालुकानिहाय पाऊस मिलीमीटर मध्ये पुढीलप्रमाणे आहे. मिरज तालुका २४.४ मिलीमीटर, जत २५.४, खानापूर ४४.८, वाळवा १७.९, तासगाव ३६.४, शिराळा ३८.५, आटपाडी १९.७, कवठेमहांकाळ ३८.६, पलूस ३५.७ आणि कडेगाव तालुक्यात ४९.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी
ठिकाण -पाणी पातळी (फूट इंचामध्ये)

  • कृष्णा पूल कराड - ६.०५
  • बहे पूल - ५.६
  • ताकारी पूल - १८
  • भिलवडी पूल - १९.०२
  • आयर्विन - १५
  • राजापूर बंधारा - २१

Web Title: 15 feet of water near Irwin Bridge in Sangli, four dams on Krishna River underwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.