शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सफाई कामगार भरतीप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: December 21, 2014 00:42 IST

महापालिकेची फिर्याद : खोट्या नियुक्तीपत्राद्वारे केली फसवणूक; प्रकरण उघड झाल्यानंतर सहा महिन्यांनी तक्रार

मिरज : मिरजेत महापालिकेच्या मानधनावरील सफाई कर्मचारी घोटाळाप्रकरणी प्रशासन अधिकारी कल्लाप्पा हळिंगळे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. कामगारांना बोगस नियुक्तीपत्रे देणारा सहाय्यक मुकादम राजू इलाही म्हेतर याच्यासह १३ जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या प्रभाग चारमध्ये बनावट नियुक्तीपत्राद्वारे मानधनावर सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. सफाई कर्मचाऱ्यांकडून नियुक्तीसाठी ४० ते ५० हजार रुपये घेऊन त्यांची हजेरीपत्रकावर नोंद करण्यात आली. १ नोव्हेंबर १३ ते २८ फेब्रुवारी १४ अखेर या सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेने लाखो रुपये वेतनही दिले. चार महिन्यांपूर्वी दलित महासंघाने केलेल्या तक्रारीमुळे बोगस नियुक्तीपत्राव्दारे कर्मचारी भरती प्रकरण उघडकीस आले; मात्र याबाबत तब्बल सहा महिन्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. प्रशासन अधिकारी हळिंगळे यांनी मिरजेत प्रभाग चारमधील आरोग्य विभागाचा सहाय्यक मुकादम राजू म्हेतर याने बोगस नियुक्तीपत्राद्वारे १३ सफाई कर्मचाऱ्यांची भरती करून १ लाख २६ हजारांचीपाच लाखाचा फटका..बोगस भरती प्रकरण उघडकीस आल्यानंतर भरती झालेल्या मानधनावरील सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. मात्र सहाय्यक मुकादमास कामावर ठेवण्यात आले. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहीने मानधनावरील कर्मचाऱ्यांचे वेतन मंजूर होऊन महापालिकेला सुमारे पाच लाखांचा फटका बसला आहे. मात्र या प्रकरणात केवळ सहाय्यक मुकादमास बळीचा बकरा बनविण्यात आल्याची सफाई कर्मचाऱ्यांत चर्चा आहे.बोगस कर्मचारी ५६; गुन्हा १३ जणांवरमानधनावरील कंत्राटी सफाई कर्मचारी भरतीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार आहे. प्रभाग चारमध्ये सापडलेल्या १२ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्रभाग दोन व तीनमध्येही बोगस कामगारांची बोगस नियुक्ती झाली आहे. एकूण ५६ बोगस कर्मचाऱ्यांपैकी केवळ १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.