Sangli: शाळेला जाताना अचानकच ह्रदय निकामी, ११ वर्षीय तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 19:44 IST2025-04-18T19:43:58+5:302025-04-18T19:44:19+5:30

मानाजी धुमाळ रेठरे धरण : जन्मताच हृदयाला छिद्र असल्याने ऑपरेशन झाले, परिस्थितीवर मात करत आनंदात तिचे शिक्षण सुरु होते. ...

11 year old Tanishka kale dies of sudden heart failure while going to school | Sangli: शाळेला जाताना अचानकच ह्रदय निकामी, ११ वर्षीय तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू

Sangli: शाळेला जाताना अचानकच ह्रदय निकामी, ११ वर्षीय तनिष्काचा दुर्दैवी मृत्यू

मानाजी धुमाळ

रेठरे धरण : जन्मताच हृदयाला छिद्र असल्याने ऑपरेशन झाले, परिस्थितीवर मात करत आनंदात तिचे शिक्षण सुरु होते. आईसोबत शाळेत जात असतानाच अचानक ह्रदय निकामी झाले अन् काळाने ११ वर्षीय तनिष्काला हिरावून घेतले.
 
तनिष्का सुजित काळे हिला जन्मताच हृदयाला लहान छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देखणी व गोरी गोमटी असलेल्या तनिष्काच्या हृदयाला लहान छिद्र असल्याने आई, वडील खूप दुःखी झाले. तनिष्काला ठीक करण्यासाठी २०१७ रोजी ह्रदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. तेंव्हापासून ती बरी होती, परंतु अधून मधून ती आजारी असायची. पण दुःखावर मात करत व चेहरा नेहमी हसरा ठेवत तिचा जगण्याचा संघर्ष सुरू होता.

दुःख विसरून मैत्रिणींसोबत लुटायची आनंद

तनिष्काच्या हृदयाला छिद्र असल्याने तिची आई व आज्जी तिची खूप काळजी घ्यायचे. आतून हृदयाचे दुःख सोसत शाळेतील मैत्रिणींना ती आपले दुःख कधी सांगायची नाही. फक्त एका मैत्रिणीला सांगितले होते, परंतु हे कोणाला सांगू नको, नाहीतर  मैत्रिणी मला खेळायलां घेणार नाहीत, याची तिला खंत वाटायची. म्हणून दुःख विसरून मैत्रिणींसोबत खेळात सामील होऊन आनंद लुटायची. तनिष्का वर्गात खूप हुशार होती.

शाळेत जातानाच काळाचा घाला 

पाचवी परीक्षेत उत्तीर्ण होत तिने सहावीच्या इयत्तेत पदार्पण केले होते. बुधवारी (दि.१६) सकाळी आईबरोबर शाळेत जात असताना घरापासून थोड्या अंतरावर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी तिला पाणी दिले, परंतु तिला उलटी झाली. तत्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  तिची प्राणज्योत मालवली.

एकुलत्या मुलीच्या मृत्यूने बापाचा धीरच गळाला

तनिष्काचे वडील भारतीय सैन्यदलात देशसेवा करतात. ते लेह लदाख येथे मेजर आहेत. बुधवारी सकाळी त्यांना तनिष्काला चक्कर आल्याचे फोनवरून सांगितले. ते विमानाने पुणे येथे येत मोटारीने गुरुवारी पहाटे घरी आले. तर एकुलत्या मुलीच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचा धीरच गळाला.

..अन् उपस्थितीच्या डोळ्यातून अश्रू तरळले

तनिष्काचे वडील सुजित हे ४ एप्रिल रोजी मुलीला भेटून कर्तव्यावर गेले होते. रोज शाळेला जाताना ती वडिलांना व्हिडिओ कॉल करायची. अंत्यसंस्कारासाठी जाताना वडीलांनी तनिष्काला मांडीवर घेत केस कुरवाळले त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू तरळले.

Web Title: 11 year old Tanishka kale dies of sudden heart failure while going to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.