शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

सांगली जिल्ह्यात ९७ निवारा केंद्रात ३६२२० व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 18:25 IST

यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे.

 

सांगली :. कोरोना संसर्गापासून बचावासाठी घराबाहेर न पडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे जेथे आहात तेथेच राहा असे आवाहन शासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे. त्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी, जिल्हाबंदी यासारख्या विविध्‍ अंगी उपाय योजना करण्यात येत आहेत.

रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी ते सद्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यातआली आहेत. यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे.

यासह जिल्ह्यात एकूण 9 कम्युनिटी किचन अंतर्गत 1258 लोकांना जेवण देण्यात येत आहे अशी माहितीजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. कवठेमहांकाळ तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 11, जत तालुक्यात 1ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 61 लोकांना, खानापूर तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 22 लोकांना, आटपाडी तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 96 लोकांना, कडेगाव तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 20 लोकांना ,वाळवा तालुक्यात 1  ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 102 लोकांना, शिराळा तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचनअंतर्गत 44 लोकांना जेवण देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 1921 व्यक्ती, तासगाव तालुक्यात 1 निवारा केंद्रामध्ये 155 व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यात 3 निवारा केंद्रामध्ये 481 व्यक्ती, जततालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 310 व्यक्ती, खानापूर तालुक्यात 18 निवारा केंद्रात 2576 व्यक्ती, आटपाडी तालुक्यात 6 निवारा केंद्रात 788 व्यक्ती, पलूस तालुक्यात 8 निवारा केंद्रात 7648 व्यक्ती, कडेगाव तालुक्यात 19 निवारा केंद्रामध्ये 10 हजार 246 व्यक्ती, वाळवा तालुक्यात 18 केंद्रामध्ये 10 हजार 964 व्यक्ती, शिराळा तालुक्यात 3 केंद्रामध्ये 229 तर सांगली-मिरज-कुपवाडमहानगरपालिका क्षेत्रात 5 निवारा केंद्रामध्ये 902 व्यक्ती आहेत. अशा एकूण 97 निवारा केंद्रामधून36 हजार 220 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे.

यामध्ये साखर कारखाना कॅम्पमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा समावेश आहे. तसेच 85 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तूपुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस