पार्टनरसोबत सायंकाळी व्हॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 14:42 IST2020-02-13T14:36:35+5:302020-02-13T14:42:20+5:30
व्हॅलेनटाईड म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवसाची सगळेच कपल्स वाट बघत असतात.

पार्टनरसोबत सायंकाळी व्हॅलेनटाईन डे साजरा करण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन!
(image credit-longlsland.com)
व्हॅलेनटाईड म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवसाची सगळेच कपल्स वाट बघत असतात. कारण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा डे साजरा केला जातो. व्हॅलेनटाईन वीकमधिल इतर दिवस साजरे करायला आपल्याला वेळ मिळत नसतो. म्हणून व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी तरी आपण आपल्या पार्टनरसोबत असाव असं आपल्याला वाटत असतं.
(image credit- blog.woohoo.in)
पण व्हॅलेनटाईन डे म्हणजे काही शनिवार- रविवार नाही जे आपल्याला ऑफिस मधून सुट्टी मिळेल. तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पार्टनरला वेळ द्यायचा असेल तर आज तुम्हाला मुंबईतील काही खास ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही ऑफिसमधून काही वेळ लवकर निघून किंवा ऑफिसची वेळ संपल्यानंतर सुद्धा जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाणं.
मरिन ड्राईव्ह
या ठिकाणी तुम्ही आपल्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकता. साऊथ मुंबईतील सर्वात लोकप्रिय अशी जागा म्हणजे मरिन ड्राईव्ह. ही जागा लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी अनेक हौसी फोटोग्राफर्स, डुडलर्स, डे ड्रिमर पाहायला मिळतात. मरिन ड्राईव्हचा समुद्र किनारा आणि वातावरणाचा आनंद घेत तुम्ही व्हॅलेनटाईन डे साजरा करू शकता.
जूहू चौपाटी
(image credit-amazinf india blog)
मुंबईमध्ये जुहु चौपाटी हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. पर्यटकांद्वारे वारंवार जुहु चौपाटीला भेट दिली जाते.जुहु चौपाटीवर संध्याकाळी गर्दी असते कारण पर्यटक सहसा ताजी हवा आणि आनंदाने समुद्र किनार्यावर चालण्यासाठी येतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला वेळ घाललण्यासाठी जूहू चौपाटीला जाऊ शकता.
छोटा काश्मिर
आरे कॉलनी मध्ये छोटा कश्मीर नावाचा एक भव्य उद्यान आहे. तऱ्हेतऱ्हेचे रंगबेरंगी फुलझाडे मऊशार हिरवळ, नारळीचे व इतर हिरवेगार वृक्ष यामुळे हे उद्यान जिवंत दिसते.या निसर्ग पार्श्वभूमीमुळेच या उद्यानात चित्रपटाचे बाहेरी चित्रीकरण केले जाते. आजपर्यंत अनेक नव्या जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रीत करण्यात आले आहे. याच परिसरात पुढे दोन अडीच कि.मी. अंतरावर आणखी एक विस्तीर्ण उद्यान असून पिकनीक स्पॉट साठी प्रसिध्द आहे. तुम्ही संध्याकाळी या ठिकाणी पार्टनरसोबत वेळ घालवू शकता.
गीरगाव चौपाटी
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत इथून डोळ्याचे पारणे फेडणारा सूर्यास्त पाहू शकता. एकाबाजूला उंच उंच इमारती आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र असं हे ठिकाणं. एका जागेवर बसून आपल्या प्रियजनांसोबत तुम्ही इथे तासन् तास गप्पा मारू शकता. ( हे पण वाचा-Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!)
शिवाजी पार्क
शिवाजी पार्क माहित नाही अशी एकही व्यक्ती मुंबईत मिळणार नाही. अगदी खेळांपासून राजकारणापर्यंत साऱ्यांनीच या शिवाजी पार्कला गाजवलं आहे. या ठिकाणी तुम्ही अगदी निवांत गप्पा मारत बसू शकता. (हे पण वाचा- पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!)