Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:11 AM2020-02-13T10:11:29+5:302020-02-13T10:28:49+5:30

एक किस एकतर नातं पुढे नेतं नाही तर नात्याच्या सुरूवातीलाच पार्टनर असहज होतो. त्यामुळे एक रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी एक चांगला किस महत्वाची भूमिका बजावतो.

Kiss Day: How to be a good kisser to make your kiss perfect | Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!

Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!

Next

आज व्हॅलेंटाइन वीकचा ७ वा दिवस आहे. आज सर्वात उत्सुकतेचा हवाहवासा वाटणारा किस डे आहे. १४ ला व्हॅलेंटाइन डे. किस म्हटला की, त्याबाबत उत्सुकताही भरपूर असते आणि त्याबाबत मनात भितीही असते. म्हणजे एक किस एकतर नातं पुढे नेतं नाही तर नात्याच्या सुरूवातीलाच पार्टनर असहज होतो. त्यामुळे एक रिलेशनशिप पुढे नेण्यासाठी एक चांगला किस महत्वाची भूमिका बजावतो. भावना व्यक्त करण्याचं, प्रेम व्यक्त करण्याचं किस हे सर्वात चांगलं माध्यम मानलं जातं. जर किड डे ला तुम्हीही तुमचं नातं एक पाऊल पुढे नेत असाल तर किससाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. याने तुम्ही एक चांगले किसर नक्कीच होऊ शकाल.

श्वासांची दुर्गंधी दूर करा

(Image Credit : howcast.com)

आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही तर टूथब्रश आणि पेस्ट घेऊन जाणार नाही. त्यामुळे सोबत माउथ फ्रेशनर नक्की ठेवा. किस करा किंवा नका करू पण तोंडाची दुर्गंधी येत असेल तर काम बिघडू शकतं. अशात पार्टनर तुमच्या जवळही येणार नाही. त्यामुळे श्वासांची दुर्गंधी दूर करण्याठी काही उपाय करा,

लिप बाम

(Image Credit : melmagazine.com)

लिप बाम केवळ मुलींसाठी नाही तर मुलांसाठीही असतो. मार्केटमध्ये असे अनेक लिप बाम मिळतात जे खासकरून मुलांसाठी तयार केलेले असतात. किस करताना जर ओठ चॅपी किंवा ड्राय होतील तर हा सुखद अनुभव मूड खराब करणाराही ठरू शकतो.

सुरूवात कशी करावी?

जर तुमच्या मनात शंका असेल की, तुम्ही पार्टनरला थेट ओठांवर किस केल्याने ती नाराज होईल तर ओठांऐवजी फोरहेड म्हणजेच कपाळावरही किस करून तुम्ही भावना व्यक्त करू शकता. याने क्लिअर होईल की, तुम्ही दोघे किसबाबत काय विचार करता. त्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता.

अस्वस्थ होऊ नका, होऊ देऊ नका

(Image Credit : quora.com)

किस जेंटल असावा, जेणेकरून पार्टनरला ऑक्वर्ड वाटणार नाही आणि दोघेही या नाजूक आणि सुंदर क्षणात असहज होऊ देणार नाही. तसेच किस करताना एकमेकांना होल्ड करतानाही मिठी जेंटल असावी. त्यात लस्ट असू नये.

बॅक सपोर्ट

(Image Credit : noellelynn.com)

किस करताना पूर्ण भार गर्लफ्रेन्डवर टाकू नका. उलट त्यांना सपोर्ट द्या. त्यांच्यावरच भार द्याल तर दोघांनाही अवघडल्यासारखं होईल आणि तुम्ही एक चांगला आनंद गमावाल. किसमध्ये प्रेम, विश्वास असावा. पार्टनरला भिती वाटू नये याची काळजी घ्या.

लक्ष्मण रेषा ओलांडू नका

किस करताना पार्टनरला जवळ घेतल्यावर हात कुठे असतील याची काळजी घ्या. कारण किस करताना कुठेही स्पर्श करणं तुमच्या पार्टनरला पसंत पडणार नाही. असं केलं तर तुमच्या कानाखाली आवाजही निघू शकतो.

किस म्हणजे सेक्स नाही

(Image Credit : bustle.com)

या भ्रमात अजिबात राहू नका की, किस करायला मिळालं म्हणजे ही शारीरिक संबंधासाठी परवानगी असते. रिलेशनशिपमध्ये प्रत्येक गोष्टीची एक स्टेप असते जी काळानुसार बदलत जाते. फिजिकल इंटिमसी फारच संवेदनशील विषय असतो. त्यामुळे यात घाई करू नका. दोघांनी रोमॅंटिक साथ एन्जॉय करावी.

Web Title: Kiss Day: How to be a good kisser to make your kiss perfect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.