व्हॅलेंटाईन डे ची म्हणजेच १४ फेब्रुवारी. प्रेमाचा गुलाबी दिवस म्हणून ओळखल्या जाणा-या दिवशी कित्येक जण आपले ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ते व्यक्त करतील. यात कुणाची प्रेम व्यक्त करण्याची पहिलीच वेळ असेल तर कित्येक जण त्या व्यक्तीला आधीपासूनच ओळखत असतील.   तर काहीजण कोणाला प्रपोज करण्याच्या प्रयत्नात असतील आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीनुसार तुमचा व्हॅलेनटाईन डे कला जाईल हे सांगणार  आहोत. 

मेष

रिलेशनशीपमध्ये  तुम्हाला संयम आणि प्रतिकूल परिस्थितीत समाधानकारक मार्ग काढावा लागेल. तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही मात्र निराश होण्याची आवश्यकता नाही. कारण सप्ताहाच्या शेवटी तुमच्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. 

वृषभ

तुमचा आजचा दिवस आनंदीदायी असेल. तुम्ही लांब पल्ल्याच्या रायडिंगला जाऊ शकता. एकमेकांसाठी खरेदी करण्याची संधी मिळेल. एकमेकांचे प्रेम मिळण्यासाठी तुम्हाला एकमेकांची काळजी घ्यावी लागेल.

मिथुन

आजचा दिवस चांगला जाईल. हा पूर्ण सप्ताह तुम्हाला चांगला जाईल. लव लाईफ सुद्धा रोमँटिक राहील. प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यासाठी चांगली संधी मिळेल. फक्त : प्रेम व्यक्त करताना संवेदना कमी आणि गंभीरता जास्त बाळगा.

Image result for valentine day gif

(image credit- best animation)

कर्क

एकमेकांशी बोलून आपले नाते घट्ट बनवा. चांगल्या नात्यांमुळे या आठवड्यात तुमचा मूड चांगला राहील. कुणी महिला किंवा मित्र तुमच्या प्रेमात सकारात्मक बदल आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे हिंमत सोडू नका.

सिंह

तुम्हाला तुमचे खरे प्रेम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न सुरु ठेवा. सर्व चांगले होईल. तुमच्या आयुष्यात रोमँटिक वेळ येणार आहे. विवाहाचे योगही बनू शकतात.

कन्या

तुमचे प्रेमसंबंध रोमँटिक राहतील. वेळ चांगला जाईल. मात्र सप्ताहात काही समस्या निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. त्यामुळे वाद टाळण्याचा प्रयत्न करा.

Image result for valentines day heart gif

(image credit- tenor)

तूळ

तुमचे लव्हलाईफ सुरळीत चालू आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा तुमच्या जोडीदारावर उमटेल. एखादी मोठी वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करु शकता.

वृश्चिक

हा सप्ताह तुमच्यासाठी लव्हलाईफ ने भरलेला असेल. तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुठे फिरायला जाण्याचे प्लान करु शकता. तुम्हाला काही सुवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

धनु

लवलाईफ चांगली असेल. मात्र कोणतीही जबाबदारी विचार करुन घ्या. आपला  आजचा दिवस सप्ताह रोमँटिक असेल. 

Image result for valentines day heart gif

(image credit- tenor)

मकर

आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला आणि लाभदायक असेल. तुम्हाला एखाद्या सुंदर महिलेची साथ सुद्धा मिळेल. काही सरप्राईजेस गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. त्यात संतुष्ट राहा, जास्तीची अपेक्षा करू नये.

कुंभ

सर्वकाही तुमच्या मनाप्रमाणे होईल. मात्र तुम्हाला जास्तीची अपेक्षा असेल. त्यामुळे हे तुम्हा दोघांसाठी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे कोणा मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या जेणेकरुन तुमचे मन शांत राहील. ( हे पण वाचा-Valentine's Day : व्हॅलेंटाइन डे कधीपासून आणि का साजरा केला जातो?)

 मीन 

तुमच्या लवलाईफमध्ये थोडे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे सांभाळून तुमच्या योजना आखा. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासाठी वेळ देत नाहीत. मात्र विश्वास आणि संयम ठेवल्यास हळूहळू गोष्टी तुमच्या बाजूने होतील. तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करा. ( हे पण वाचा-Valentines Day : पार्टनरला 'हे' रोमॅंटिक मेसेजेस पाठवून व्हॅलेंटाईन डे बनवा अविस्मरणीय!)

Web Title: Valentines Day 2020 Horoscope: Zodiac for how will be your Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.