Valentine day : तुझ्याविना करमेना! व्हेलेंनटाईन डे ला पत्नीला गिफ्ट केली किडणी; कारण वाचून तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 01:49 PM2021-02-14T13:49:34+5:302021-02-14T13:57:37+5:30

Valentine day : रिता पटेल या ऑटोइम्यून किडनी डिस्फंक्शनच्या समस्येचा सामना करत आहेत.

Valentine day : Gujarat vinod patel donate kidney valentine day wife rita patel ahmedbad | Valentine day : तुझ्याविना करमेना! व्हेलेंनटाईन डे ला पत्नीला गिफ्ट केली किडणी; कारण वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Valentine day : तुझ्याविना करमेना! व्हेलेंनटाईन डे ला पत्नीला गिफ्ट केली किडणी; कारण वाचून तुमचेही डोळे पाणावतील

Next

गुजरातमधील एका माणसानं व्हॅलेंटाईन डे (Valentine day) निमित्तानं आपल्या आजारी पत्नीला किडणी दान केली आहे. एनएनआयच्या रिपोर्टनुसार विनोद पटेल १४ फेब्रुवारीला म्हणजे आज अहमदाबादमध्ये आपल्या पत्नीला किडनी दान करत आहेत. विशेष म्हणजे हे जोडपं आपल्या लग्नाचा २३ वा वाढदिवसही साजरा करत आहेत. रिता पटेल या ऑटोइम्यून किडनी डिस्फंक्शनच्या समस्येचा सामना करत आहेत.

मागच्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजूनही त्यांचा किडनीचा आजार पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या पतीनं त्यांना किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. तपासणीदरम्यान दिसून आले की, पती विनोद यांची किडणी पूर्णपणे व्यवस्थित लावली जाऊ शकत होती. म्हणून विनोद यांनी १४ फेब्रुवारीला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या एक खाजगी रुग्णालयात किडणी दान केली आहे.

Kidney

अहमदाबादचे डॉक्टर सिद्धार्थ मवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑटो इम्यून आजार झाल्यानंतर व्यक्तीच्या  अवयवांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळेच रिता यांची किडणी खराब झाली. विनोद यांनी सांगितले की,  ''पत्नीच्या वेदना पाहून मी तिला माझी किडनी देण्याचा विचार केला. रिताचं वय ४४ वर्ष आहे. याआधी तिचे डायलिसिस सुद्धा झाले आहे.''  कोल्हापुरीला डिमांड भारी; दोघींनी फक्त 300 रुपयात उभारला चपलांचा व्यवसाय, आता घेताहेत 3 लाखांची कमाई

त्यांनी पुढे यांनी पुढे सांगितले की, ''मला सगळ्याना असा मेसेज द्यायचा आहे की प्रत्येकानं आपल्या पार्टनरची इज्जत करायला हवी.  गरज पडल्यानंतर एकमेकांच्या मदतीसाठी उभं राहायला हवं.'' व्हेलेंनटाई डेच्या दिवशी किडनी दान केल्यामुळे  रिता पुन्हा एकदा एक नवीन जीवन जगू शकणार आहेत. त्या स्वतःला खूप भाग्यशाली समजतात. शाब्बास पोरा! १० वीच्या मुलानं भंगारापासून बनवली इलेक्ट्रॉनिक बाईक, अन् वडील म्हणाले.....

Web Title: Valentine day : Gujarat vinod patel donate kidney valentine day wife rita patel ahmedbad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.