मुलींना इंप्रेस करायचं असेल तर कॉम्पलिमेंट देताना 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 14:51 IST2020-02-24T14:11:48+5:302020-02-24T14:51:36+5:30
तुम्हाला तिच्या नजरेत चांगल बनायचं असेल तर कोणतीही कमेंट देताना मनापासून वाटत असेल तरच द्या.

मुलींना इंप्रेस करायचं असेल तर कॉम्पलिमेंट देताना 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात
(image credit- El crema)
तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीला कंमेट देत असता म्हणजे तु सुंदर दिसते, ड्रेसिंग मस्त आहे वैगेरे. तेव्हा मुलींना छान वाटत असतं. या गोष्टीची पण काळजी घ्यायला हवी की नकळतपणे तर तुम्ही कमेंट करताना एखादी चूक केली तर हीच गोष्ट महागात पडू शकतं. चला तर मग जाणून घ्या मुलींवर कमेंट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरचेचं आहे.
नातं कसं आहे
सगळ्यात आधी ज्या व्यक्तीला तुम्ही कॉम्पलिमेंट देणार आहात. तिचं नातं तुमच्यासोबत कसं आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर ती व्यक्ती तुमच्या जास्त जवळची असेल तर गाणं म्हणून किंवा कवितेच्या माध्यमातून तुम्ही कॉम्प्लिमेंट देऊ शकता.
जबरदस्ती करू नका
कोणत्याही मुलीचं कौतुक करत असताना जबरदस्ती त्यांना खूश करण्यासाठी करू नका. कारण हे त्या व्यक्तीला लगेच कळून येईल. पण जर तुम्हाला तिच्या नजरेत चांगल बनायचं असेल तर कोणतीही कमेंट देताना मनापासून वाटत असेल तरच द्या.
वेळ पाहून कौतुक करा
मुलीचे कौतुक करण्याआधी वेळ कशी आहे. हे आधी पाहणं मह्त्वाचं असतं. अनेकदा मुलं घाईघाईत मुलींना कमेंट देतात. त्यामुळे मुलींकडून निगेटिव्ह कंमेट मिळण्याची शक्यता असते. काही मुलींना त्याचं कौतुक केलेलं आवडतं पण काहींना जराही आवडत नाही. त्यामुळे वातावरण पाहून कौतुक करा.
शारीरिक सौंदर्यावरून कौतुक करू नका
कोणत्याही मुलीची शरीरयष्टी किंवा शारिरीक सुंदरता पाहून कौतुक करू नका. मुलीचा फेस, डोळे किंवा स्माईल यावर कमेंट न करता मुलींची कोणतीही चांगली सवय किंवा स्वभाव तुम्हाला आवडला असेल तर त्याचं कौतुक करा. कारण त्यामुळे मुली तुमच्यावर जास्त इंप्रेस होतील. जास्त ओवर रिएक्टही होऊ नका. ( हे पण वाचा-लग्नाआधी जाणून घ्या कोणत्या राशीचे पुरूष असतात रोमँटिक आणि प्रामाणिक!)
हायपर एक्टिव्ह होऊ नका
मुलीचं कौतुक करत असताना इतर मुलींना नावं ठेवू नका. कारण त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल गॉसिप करता. असं वाटू शकतं. अर्थात तुमची बेस्ट फेंड असेल तर इतरांबद्दल एखादी कमेंट करायला हरकत नाही. पण उगाच इतर मुलींबद्दल चुकीच्या कमेंट्स केल्यास नकारात्मक परिणाम घडून येईल. अनेक मुली आपली तुलना हिरोईन्ससोबत करत असतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या मुलीला कमेट द्यायची असेल तर तु एखाद्या हिरोईनप्रमाणे दिसते किंवा तुझं फेसिंग अमुक एका अभिनेत्रीप्रमाणे आहे. अशी कमेंट दिल्यास मुली प्रभावित होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-तुम्हाला माहितही नसतील,सुंदर स्त्रियांना पाहून पुरूषांच्या मनात येतात 'या' ८ गोष्टी!)