एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुरूवातीला सगळं चागलं चाललेलं असतं. पण  काही कालावधीनंतर एकमेकांच्या स्वभावामधील काही  गोष्टी खटकायला सुरूवात होते. आज आम्ही तुम्हाला मुलांना पार्टनरच्या कोणत्या गोष्टी खटकतात याबाबत सांगणार आहोत. त्यामुळे मुलं मुलींना जराही सहन करू शकत नाही. कपल्समध्ये सतत भांडणं होण्यामागे अनेकदा मुलींच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असतात. मुलं मोकळेपणाने सांगत नसले तरी त्यांना मुलींच्या काही सवयी आवडत नाहीत. 

राईचा पर्वत करणे

अनेक मुलींना सवय असते की लहान-लहान गोष्टी लक्षात ठेवून पार्टनरसोबत भांडत असतात.  मग कारण काहीही असो प्रत्येक गोष्ट मोठी करून त्यावरून वाद घालण्यामुळे मुलांना मुलींचा जास्त राग येत असतो. मग ते फोन बिझी असण्यावरून असेल किंवा खाण्यापिण्यावरून, फिरायला जाण्यावरून असेल अशा प्रत्येक गोष्टीचा राग केल्यामुळे ब्रेकअप होतं. 

सतत रागावणे

मुलींना नेहमी वाटत असतं की आपल्या पार्टनरने आपल्या कंट्रोलमध्ये राहायला हवं. जर एखादी गोष्ट पार्टनरने मुलींच्या मनासारखी केली नाही शांत बसणं, टोमणे मारणं हे प्रकार सुरू होतात. मग यातून वादाला तोंड फुटतं. म्हणून काही घडल्यानंतर  थंड डोक्याने विचार करून मगच रिएक्ट करा. 

पार्टनरने आपल्या मनातलं ओळखायला हवं

मुलींना असं वाटत असतं की आपला पार्टनर आपल्याबद्दल काय विचार करतो किंवा त्याच्या डोक्यात काय विचार चालतात हे आपल्याला माहित असायला हवं.  किंवा आपल्या मनात काय चाललंय हे पार्टनरला माहित असायला हवं.  पण तुमचा पार्टनर सुद्धा माणूसच आहे. अनेकदा काही गोष्टी बोलल्याशिवाय कळत नाहीत तेव्हा  तुम्हाला वाटत असेल ते स्पष्ट बोला. अनेकदा गोष्टी मनात ठेवल्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा- म्हणून मुलं घरी बसलेल्यांपेक्षा जॉबला जाणाऱ्या मुलींनाच लग्नासाठी निवडतात!)

जास्त अपेक्षा ठेवणं

मुली आपल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा ठेवत असतात. ही खूप चुकिची गोष्ट आहे. कारण जेव्हा  ब्रेकअप होतं तेव्हा त्यांना यातून सावरणं खूप कठिण जातं.  त्यापेक्षा कोणत्याही अपेक्षा न ठेवता जर तुम्ही पार्टनर सोबत रहाल तर रिलेशनशिप चांगलं राहिल. ( हे पण वाचा- इंटरकल्चर रिलेशनशिपमधील समस्यांना 'या' सोप्या उपायांना करा हॅण्डल)

Web Title: Relationship tips for boyfriends and husband often sad with these habits of their girlfriend myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.