पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:27 IST2020-02-13T13:12:57+5:302020-02-13T13:27:48+5:30
रिलेशनशीपमध्ये असताना चुका करणं हे खूपचं कॉमन आहे.

पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!
(image credit- pexels)
रिलेशनशीपमध्ये असताना चुका करणं हे खूपचं कॉमन आहे. पण याच चुका ब्रेकअपचं कारण सुद्धा ठरू शकतात. काही मुलांचं वागण असं असतं की त्यांना ब्रेकअपनंतर सुद्धा कळत नाही. की त्यांच्या वागण्यात चुका होत आहेत. मुलं स्वतःच्याच धुंदीत असतात. त्यांच्या चुकांमुळे त्यांच्यापासून मुली लांब जातात. मग त्यांना असं वाटत असतं की ब्रेकअपचं कारणं पार्टनर आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या चुकीच्या आणि नातं तुटण्यासाठी कारणीभूत असलेल्या सवयी बदलू शकता.
(image credit-vixen daily)
असुरक्षिततेची भावना
कोणावरही प्रेम करणं हे चुकीचं नसतं. पण प्रेमात वेडं होणं ही गोष्ट प्रत्येकालाच घातक ठरत असते. काही लोक आपल्या पार्टनरच्या विषयी असुरक्षितता फिल करतात. तिच्या कोणत्याही गोष्टीवर संशय घेणे, तुमच्या मर्जीनुसार कपडे घालायला लावणे, कुठेही फिरायला जाण्यासाठी अडवणे, सोशल मिडियावर एक्टिव्ह असण्यावरून बोलणे. या गोष्टींमुळे मुलींना खुपच असुरक्षित वाटत असतं. जर तुम्हाला पार्टनरच्या कोणत्याही गोष्टीचा राग येत असेल तर समोरासमोर बसून मगच बोला.
जास्त अपेक्षा ठेवणे
सुरूवातीच्या काळात कोणत्याही नात्यात खूप जिव्हाळा आणि प्रेम दिसून येत असतं. पण हळू हळू हे सगळं कमी होऊ लागतं. कोणत्याही मुलीला असं वाटत असतं की आपल्या पार्टनरने आपल्याला वेळ द्यायला हवा, तीची काळजी घ्यायला हवी. पण जेव्हा तुम्ही या गोष्टी करण्यात कमी पडत असता. तसंच गर्लफ्रेडबद्दल इतरांशी बोलण्यासाठी विचार करता, तिच्यापासून दूर राहता आणि जेव्हा इंटरेस्ट कमी होतो तेव्हा इतर मुलींकडे लक्ष देता. या गोष्टी मुलींना जराही आवडत नसतात. ( हे पण वाचा-kiss day : किस करण्याचे फायदे वाचाल तर दररोज साजरा कराल किस डे!)
विश्वास नसणे
सगळ्याच रिलेशनशिपमध्ये विश्वास हा फॅक्टर खुप महत्वाचा असतो. जर विश्वास नसेल तर नात्यातील प्रेम कमी होत जात असतं. अनेक नाती लगेचच जुळतात. पण विश्वासाचा अभाव दिसून येतो. अनेकदा मुलं मुलींवर कारण नसाताना संशय घेत असतात. त्यामुळे नातं तुटत असतं. मग तु इतका वेळ कोणाशी बोलत होतीस, माझ्यासाठी नाही बाकी सगळयांसाठी तुला वेळ आहे, ऑनलाईन जास्तवेळ का होतीस, असे प्रश्न जास्त इरिरेट करणारे असतात. त्यामुळे पार्टनर तुम्हाला कधीही सोडून जाऊ शकते. ( हे पण वाचा-Kiss Day : गुड किसर होण्यासाठी एकापेक्षा एक खास टिप्स, पार्टनर कायम लक्षात ठेवेल किस!)