तुम्ही बॉससोबत स्मोक करता का? मग हे वाचून तुमच्या मनात लड्डूच लड्डू फुटतील....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:00 AM2019-12-11T11:00:10+5:302019-12-11T11:03:49+5:30

खरंतर स्मोकिंग करण्याची सवय ही जीवघेणी आहे. पण एकदा का तुम्ही स्मोकिंगच्या जाळ्यात अडकलात तर त्यातून बाहेर पडणं तितकं सोपं नाही.

Men who smoke with their male boss likely to get promotion faster | तुम्ही बॉससोबत स्मोक करता का? मग हे वाचून तुमच्या मनात लड्डूच लड्डू फुटतील....

तुम्ही बॉससोबत स्मोक करता का? मग हे वाचून तुमच्या मनात लड्डूच लड्डू फुटतील....

googlenewsNext

खरंतर स्मोकिंग करण्याची सवय ही जीवघेणी आहे. पण एकदा का तुम्ही स्मोकिंगच्या जाळ्यात अडकलात तर त्यातून बाहेर पडणं तितकं सोपं नाही. बरं मुद्दा स्मोकिंगशी संबंधित पणा जरा वेगळा आहे. एका रिसर्चमधून स्मोकिंग संदर्भात एक अजब-गजब दावा करण्यात आला आहे. या रिसर्चनुसार, ऑफिसमध्ये जर एखादा पुरूष सिगारेट ब्रेक घेत असेल तर त्याला नेहमीच महिलांच्या तुलनेत जास्त अ‍ॅडव्हांटेज मिळतं. हे आम्ही नाही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.

नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक्स रिसर्चकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जर तुमचा मॅनेजर पुरूष असेल आणि तो स्मोकिंग करत असेल तर तुमच्या बॉससोबत स्मोकिंग शेअर करणाऱ्या सहकाऱ्यांना जे लोक स्मोकिंग करत नाहीत त्यांच्यापेक्षा लवकर प्रमोशन मिळतं. 

पुरूष मॅनेजरचा पुरूषांना मिळतो फायदा?

या रिसर्चमधून एक अशीही बाब समोर आली की, पुरूष कर्मचाऱ्यांचे मॅनेजर जर पुरूष असतील तर त्यांना या गोष्टीचा फायदा मिळतो. तर महिलांना प्रमोशन मिळण्याचं प्रमाण एकसारखाच आहे. आणि महिलांच्या प्रमोशनवर या गोष्टीचा काही फरक पडत नाही की, त्यांचा मॅनेजर पुरूष आहे की एखादी महिला.  

पुरूषांना लवकर मिळतं प्रमोशन

हॉर्वर्ड बिझनेस स्कूलचे जो क्युलने आणि यूसीएलए एंडरसन स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे रिकार्डो पेरेज यांनी मिळून हा रिसर्च केला. या रिसर्चमध्ये याआधी केल्या गेलेल्या रिसर्चची देखील मदत घेण्यात आली. आधीच्या रिसर्चमधून असं समोर आलं होतं की, पुरूष स्पॉन्सर, दुसऱ्या ग्रुपच्या तुलनेत पुरूषांसोबतच चांगलं काम करतात आणि या कारणाने त्यांचं प्रमोशन चांगलं होतं. 

एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, लोक अशा लोकांचं समर्थन करणं पसंत करतात जे त्यांच्यासारखेच असतात. त्यामुळे पुरूषांना महिलांच्या तुलनेत अधिक फायदा मिळतो. असं असण्याचं कारण असही आहे की, एक्झिक्युटीव्ह पदांवर महिलांची संख्या कमी बघायला मिळते.

(टिप : वरील रिसर्च हा केवळ माहितीसाठी देण्यात आला आहे. यातून स्मोकिंगचा प्रसार करणे किंवा लोकांना स्मोक करण्यास भाग पाडणे असा कोणताही हेतू नाही. स्मोकिंग हे आरोग्यास हानिकारक आहे, यावर आमचा विश्वास आहे.)


Web Title: Men who smoke with their male boss likely to get promotion faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.