(image credit-seekpng.com)

प्रेम करणं खूप सोपं असतं. पण त्या नात्याला टिकवणं सुद्धा तितकचं महत्वाचं असतं. सध्याच्या काळात अनेक मुलांकडे किंवा मुलींकडे आकर्षीत होऊन आपण नवीन नाती तयार करत असतो. पण सुरूवातीच्या काळात जोपर्यंत ओळख झालेली नसते तोपर्यंत आपल्याला खूप छान वाटतं असतं. पण कालांतराने या नात्यांमध्ये तोचतोचपणा वाटायला सुरूवात होते.  नातं तुटण्याची सुद्धा शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी शेअर करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमचं नात किती काळ टिकणार आहे याची कल्पना येईल.

Image result for COUPLE
(Image credit- freepik.com)

विश्वास

Related image(Image credit- freepik.com)

तुम्हाला जर कोणतही नातं टिकवायचं असेल तर  एकमेकांवर विश्वास असणं फार महत्वाचं असतं. जर तुमचा एकमेकांवर विश्वास असेल तर कोणत्याही कठिण प्रसंगात तुम्ही  स्टेबल राहून ती परिस्थिती हाताळण्यात यशस्वी होऊ शकता.  सध्याच्या काळात अनेक मुलांचे किंवा मुलींचे  एकापेक्षा अधिक पार्टनर असणे ही गोष्ट कॉमन दिसून येते.  जर तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल तर  तुमच्या पार्टनरला विश्वासात घ्या. त्याला किंवा तिला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा असेल तरच नातं पुढे कन्टिन्यू करा.  (हे पण वाचा-मुलांचे लुक्स आणि बॉडी नाही, तर 'या' गोष्टी नोटीस करून मुली देतात होकार...)

शेअरींग करणे

Image result for COUPLE(image credit- Unsplash)

पार्टनरशी सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या तर तुमचं नातं अधिक घट्ट होत जातं. जर तुमच्या पार्टनरला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, मानसीक त्रास असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून पार्टनरच्या  काय अपेक्षा आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तितकं स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा. गैरसमज निर्माण झाल्यास नातं तुटू सुद्धा शकतं. म्हणून शक्य होईल तेवढ्या गोष्टी क्लिअर करा. ( हे पण वाचा- रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध)

समजून घेणे

Related image(image credit- only kashmir.in)

अनेक नात्यामध्ये  भांडणं होत असतात. तसंच लहानमोठ्या कुरबूरींचा सामना करावा लागत असतो. अशावेळी समोरच्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा पार्टनरला समजून घ्या, जर तुम्हाला अडचण असेल तर पार्टनरशी बोलून प्रश्न सोडवता येतील की नाही ते पाहण्याचा प्रयत्न करतात. 

आवडी-निवडी ओळखा

Image result for COUPLE(image credit- vocle)

जर तुम्हाला एकमेंकांबद्दल माहिती असेल तर तुम्ही कोणतीही परिस्थिीती व्यवस्थित हाताळू शकता. आपल्या पार्टनरला काय आवडतं काय आवडत नाही. हे माहीत असेल तर तुमची भांडण होणार नाहीत. शक्यतो पार्टनरला ज्या गोष्टी  आवडत नाही त्या गोष्टी करणं टाळा. 


एकमेकांना वेळ द्या

Image result for COUPLE

चांगल्या नात्यासाठी एकमेकांना वेळ देणं फार महत्त्वाचं असतं. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्याचा प्रयत्न करा. हा वेळ घालवत असताना एकमेकांच्या स्वभाव ओळखून वागा. फिरायला जाण्यासाठी अनेकदा तुम्ही त्याच त्याच ठिकाणांना महत्व देता त्यामुळे तुमच्या पार्टनरला बोअर सुद्धा होऊ शकतं. तुमच्या बाबतीत सुध्दा असं होत असेल तर  तुम्ही  फिरायला जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा पर्याय शोधा. 

Web Title: Know the sign of healthy relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.