सध्याच्या काळात नातेसंबंधामध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्याला वेगळंच वळणं लागताना दिसून येतं. विवाहीत जोडप्याच्या आयुष्यात बऱ्याच समस्या येत असतात. एकमेकांना वेळ न दिल्यामुळे किंवा शारीरिक, मानसीक गरजा अथवा अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि विवाहबा़ह्य संबंध ठेवले जातात. तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी घडल्यानंतर एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर करण्यासाठी  लोकं प्रवृत्त होतात.

(Image credit- only my health )

कमी वयात लग्न

(Image credit- freemalasia.com) 

समाजातल्या अनेक मुलामुलींची लग्न ही कमी वयात केली जातात. त्यामागे वेगवेगळी परिस्थितीजन्य कारणं असतात. घरच्यांचा  दबाव असणे, दडपण असणे. यांमुळे २० वर्षाच्या वयातच काही मुलींना लग्नाला सामोरे जावे लागते.  काही कालावधीनंतर आपण आयुष्याची मजा घेऊ शकलो नाही. अशी भावना निर्माण होते. त्यामुळे अशा व्यक्तींच मन चंचल होत जात. बाहेरच्या जगात आनंद शोधण्यासाठी मग विवाहबाह्य सबंध केले जातात.


शारीरिक गरज

(image credit- newsable.asiannews.com)

मानवी शरीराला सेक्सची गरज असते. सेक्सच्या आवश्यकतेची पूर्तता झाली नाही तर  माणसं विवाह बाह्य संबंधांकडे वळतात. कारण पार्टनरकडून त्यांना शारीरिक सुख मिळतं नसतं. त्यावेळी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशीं जवळीक साधायला सुरूवात होते. 


 इच्छित जोडीदारासोबत लग्न न होणे.


 (image credit- indiamart.com)

लग्नाच्या आधी सगळ्यांचच अफेअर असतं. पण काही कारणामुळे आपण आपल्या प्रियसी व प्रियकरा सोबत विवाह करू शकत नाही अशा वेळी ती दोन माणसे आपल्या लग्नाआधीच्या जोडीदाराला गुप्तपणे भेटून आपसात सुख दुःख वाटत असतात. लग्नाआधी एकत्र घालवलेला काळ कधीही विसरता येत नसतो. अश्यावेळी लग्न ज्या व्यक्तीसोबत झालं आहे. त्या व्यक्तीकडून गरजा पूर्ण होत नसतील तर प्रियकाराशी संपर्क होतो.

 
 एकटेपणा

(Image credit- primetweets.com)

ज्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे. ती व्यक्ती तुमच्यापासून  दूर राहत असेल तर त्याला कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असते. म्हणूनच माणसाने एकटेपणाला घालवण्यासाठी बऱ्याच वेळा विवाहबाह्य संबंध असल्याचे दिसून येते. तर वैवाहिक जोडीदार आपल्या पासून दूर राहत असल्यास संभोगाचे विचार मनात येऊन सुद्धा व्यक्ती विवाह बाह्य संबंधांकडे वळू शकतो.

Web Title: Know the reasons of extramarital affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.