बांधकाम प्रकल्पांमधील निकृष्ट प्लंबिंगची 'लपलेली किंमत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:31 IST2025-10-06T11:30:12+5:302025-10-06T11:31:14+5:30

प्लंबिंग म्हणजे इमारतीची जीवनवाहिनी. ते शुद्ध पाणी आणते, सांडपाणी बाहेर टाकते आणि हे काम दररोज, दशकानुदशके करत राहते.

The 'hidden cost' of poor plumbing in construction projects | बांधकाम प्रकल्पांमधील निकृष्ट प्लंबिंगची 'लपलेली किंमत'

बांधकाम प्रकल्पांमधील निकृष्ट प्लंबिंगची 'लपलेली किंमत'

लेखकः विक्रम चव्हाण, वरिष्ठ सिव्हिल इंजिनिअर - २२ वर्षांचा अनुभव

गेल्या दोन दशकांत मी लहान गृहप्रकल्पांपासून मोठ्या व्यावसायिक संकुलांपर्यंत आणि नगरपालिका इमारतींपर्यंत विविध प्रकल्पांवर काम केले आहे. या काळात मला एक गोष्ट पक्की समजलीः इमारतीची खरी गुणवत्ता फक्त तिच्या डिझाइनवर किंवा लोकेशनवर अवलंबून नसते, तर त्या इमारतीला कार्यरत ठेवणाऱ्या यंत्रणांवर असते. यापैकी सर्वात महत्त्वाची, पण वारंवार दुर्लक्षित केली जाणारी प्रणाली म्हणजे प्लंबिंग.

प्लंबिंग म्हणजे इमारतीची जीवनवाहिनी. ते शुद्ध पाणी आणते, सांडपाणी बाहेर टाकते आणि हे काम दररोज, दशकानुदशके करत राहते. पण कारण ही व्यवस्था भिंतींच्या आत आणि मजल्याखाली लपलेली असते, त्यामुळे ती नजरेआड जाते आणि बहुतेक वेळा दुर्लक्षिली जाते. जेव्हा बजेट कमी असते, तेव्हा काही बांधकाम व्यावसायिक प्रथम प्लंबिंगच्या साहित्यावरच खर्च कमी करतात. इथेच समस्या सुरू होतात.

अनुभवातून घेतलेला महागडा धडा

काही वर्षांपूर्वी मी सुमारे २०० फ्लॅट्स असलेल्या एका मध्यम आकाराच्या गृहनिर्माण सोसायटीवर काम केले. प्रकल्पावर बजेटचा ताण होता, म्हणून कंत्राटदाराने स्वस्त, अप्रमाणित ब्रँडच्या पाईप्स व फिटिंग्ज घेतल्या. कागदावर पाहता काही लाखांची बचत झाली.

पण फक्त तीन वर्षांतच रहिवाशांनी तक्रारी सुरू केल्याः

> बाथरूमच्या भिंतींमध्ये गळती
> स्वयंपाकघरातील पाईप जॉइंट्स निकामी होणे
> ओलसरपणा व बुरशी निर्माण होणे
> विजेच्या शाफ्टमध्ये पाणी ठिबकणे -धोकादायक स्थिती

दुरुस्तीवर जवळपास ₹९.५ लाख खर्च झाले, याशिवाय रहिवाशांना सतत चालणाऱ्या दुरुस्तीचा त्रास सहन करावा लागला. रहिवाशांनी सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांत नाराजी व्यक्त केली. थोडी बचत करायचा प्रयत्न शेवटी आर्थिक, प्रतिमा आणि ग्राहकांचा विश्वास- या सर्वच बाबतीत तोटा ठरला.


दर्जेदार पाईप्स वापरल्यास वेगळा परिणाम

त्याच सुमारास मी दुसऱ्या शहरात एका गृहप्रकल्पाचे काम पाहिले. त्या बांधकामदाराने फक्त BIS प्रमाणित अजय पाईप्सच वापरण्याचा आग्रह धरला. मी पूर्वीही हा ब्रँड वापरला होता आणि त्यांचे CPVC आणि PVC सिस्टीम्स गुणवत्तेत सातत्यपूर्ण, बसवायला सोपे आणि दाब व तापमानातील बदल सहन करणारे असल्याचे मला ठाऊक होते.

तो प्रकल्प आज दहा वर्षांपूर्वी पूर्ण झाला. आजपर्यंत जवळजवळ कोणत्याही मोठ्या प्लंबिंग तक्रारी आलेल्या नाहीत. क्वचित किरकोळ समस्या आल्या असल्या तरी ब्रँडच्या मजबूत after-sales support मुळे लगेच सोडवता आल्या. सुरुवातीला थोडा जास्त खर्च करून केलेल्या गुंतवणुकीने दीर्घकाळात मोठी बचत आणि समाधानी ग्राहक दिले.

स्वस्त पाईप्स का फसतात?

स्वस्त पाईप्स अनेक बाबतीत तडजोड करतातः
> निकृष्ट कच्चा मालः पुनर्वापर केलेला अशुद्ध प्लास्टिक वापरतात, ज्यामुळे पाईप लवकर कमकुवत होतो
> असमान जाडीः पातळ भाग दाब सहन करू शकत नाहीत, त्यामुळे फुटणे किंवा गळती होते
> निकृष्ट फिटिंग्ज: पाईप मजबूत असला तरी फिटिंग नीट सील न झाल्यास गळती होते
> चाचणीचा अभावः दर्जा तपासणी न झाल्यामुळे दोष लक्षात न येता पुढे जातात

विशेषतः उंच इमारतींमध्ये, जिथे पाण्याचा दाब जास्त असतो किंवा गरम पाणी वापरले जाते, तिथे या कमतरता लवकर उघड होतात. गळती दिसायला लागेपर्यंत भिंतींच्या आतली हानी मोठ्या प्रमाणावर झालेली असते.

प्लंबिंग बिघाडाचा खरा खर्च

प्लंबिंग निकामी झाल्यावर फक्त रहिवाशांचा त्रासच होत नाही, तरः

> सोसायटीचे देखभाल खर्च वाढतात
> भिंती, छत, फरशी यांचे नुकसान होते
> हजारो लिटर पाणी वाया जाते
> बुरशी व जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येते
> बांधकामदार, रहिवासी व कंत्राटदार यांच्यात वाद होतात

बांधकामदारासाठी हे म्हणजे प्रतिष्ठेचे नुकसान, कमी शिफारसी आणि कधीकधी कायदेशीर अडचणी.

विश्वसनीय ब्रँडची गरज

माझ्या अनुभवानुसार बाजारात अनेक पाईप ब्रँड आहेत, पण काहीच ब्रँड्स खऱ्या अर्थाने अनुभवसंपन्न आणि विश्वासार्ह आहेत. अजय पाईप्स सारख्या ब्रँडची मी शिफारस करतो कारण वर्षानुवर्षांचा अनुभव सांगतो की त्यांची उत्पादनेः
> सातत्यपूर्ण दर्जाची - प्रत्येक बॅच BIS आणि ASTM मानकांनुसार
> अचूक निर्मिती - पाईप्स व फिटिंग्जची परिपूर्ण जुळवणूक, गळती कमी
> अधिक टिकाऊ वैशिष्ट्ये - उच्च कार्यक्षमता व दीर्घायुष्य
> तांत्रिक मदत - साईटवर कंत्राटदारांना त्वरित सहाय्य
> दीर्घकालीन परिणामकारकता - दशकानुदशके मोठ्या अडचणीशिवाय कार्यरत प्रणाली

बांधकामदारासाठी असा ब्रँड म्हणजे विमा तर गृहस्वामीसाठी मानसिक समाधान.

बांधकामदार आणि गृहस्वामींसाठी धडे

तुम्ही साधे घर बांधत असाल किंवा मोठा व्यावसायिक टॉवर - प्लंबिंगमध्ये तडजोड करणं शहाणपणाचं नाही.
१. करारामध्ये प्रमाणित ब्रँड नमूद करा फक्त स्वस्त पुरवठादारावर अवलंबून राहू नका
२. ग्राहकांना समजावून सांगा- चांगले प्लंबिंग म्हणजे गुंतवणूक आहे, खर्च नाही
३. प्रशिक्षित प्लंबरबरोबर काम करा- उत्तम पाईपसुद्धा चुकीच्या बसवणीमुळे फेल होतो

अंतिम शब्द

प्लंबिंग व्यवस्था लपलेली असते, पण तिचे महत्त्व अपरंपार आहे. सिव्हिल इंजिनिअर म्हणून मी प्रत्यक्ष पाहिले आहे - निकृष्ट साहित्यामुळे होणारे नुकसान आणि विश्वासार्ह बँडमुळे मिळणारी खात्री. माझा सल्ला सोपा आहे: शंका असेल तर खर्चकपातीपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या.

माझ्या प्रकल्पांमध्ये अजय पाईप्सने नेहमीच विश्वासू भागीदार म्हणून साथ दिली आहे- केवळ दिसायला सुंदर नाही, तर लपलेल्या आणि आवश्यक यंत्रणेतही टिकाऊपणा आणून. हेच प्रत्येकासाठी खरी किंमत निर्माण करतं.

Web Title : निर्माण परियोजनाओं में घटिया प्लंबिंग की 'छुपी कीमत': एक विश्लेषण

Web Summary : निर्माण में खराब प्लंबिंग महंगी मरम्मत और प्रतिष्ठा को नुकसान पहुंचाती है। अजय पाइप्स जैसी गुणवत्ता वाली सामग्री टिकाऊपन सुनिश्चित करती है, भविष्य की समस्याओं को रोकती है और ग्राहकों की संतुष्टि प्रदान करती है।

Web Title : Hidden Costs: Poor Plumbing's Impact on Construction Projects Examined

Web Summary : Poor plumbing choices in construction lead to costly repairs, reputational damage. Quality materials, like Ajay Pipes, ensure durability, prevent future issues, and provide customer satisfaction, ultimately saving money and ensuring structural integrity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.