शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे व्यसनमुक्ती अभियान

By admin | Updated: November 20, 2015 00:13 IST

महिला सक्षमीकरण कार्यक्रम : समता वर्षात सामाजिक दृष्टीकोन

रत्नागिरी : समता वर्षानिमित्त जिल्हा परिषद, रत्नागिरी आणि रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्यसनमुक्ती अभियान राबवणार आहेत. तसेच जिल्ह्यातील १००० महिलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. सन २०१५ हे समता वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या वर्षाच्या कालावधीमध्ये शासकीय कामकाज करीत असताना सामाजिक दृष्टीकोन ठेवून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पावले उचलली आहेत. व्यसनाधीनतेमुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. समता वर्षानिमित्त हा उपक्रम हाती घेऊन व्यसनधीनतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शन शिबिरासाठी व्यसनमुक्ती जागृतीतून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. गर्भवती महिलांना लसीकरण, आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी, यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने व्हाईस एसएमएसची खास सोय केली आहे. या व्हाईस एसएमएसद्वारे गर्भवती महिलांना लसीकरण व आरोग्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रमाई आंबेडकर महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील १००० महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी करणार आहे. अशा प्रकारे विविध उपक्रम राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी मारुती खडके यांच्याशी चर्चा केली असून, हे उपक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. हा जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रेरणा देशभ्रतार यांचे प्रयत्न सुरू आहेत. (शहर वार्ताहर)जिल्ह्यात सुशिक्षितांसाठी स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्रत्येक महिन्यात केले जाते. त्याचबरोबर जिल्ह्यात पाणी आडवा, पाणी जिरवा, या उपक्रमाखाली सुमारे १० हजार बंधारे उभारण्यात येत आहेत. हे करीत असतानाच समाजोपयोगी इतर उपक्रमही जिल्ह्यात राबवून जनतेला त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार रिलायन्सच्या सहाय्याने उपक्रम हाती घेत आहेत.