शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत तीन दिव्यांग शिक्षक निलंबित; कर्मचारी, शिक्षकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:33 IST

जिल्हा परिषदेकडून कारवाई

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील ३ शिक्षकांवरजिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १०६ कर्मचारी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्या कर्मचारी, शिक्षकांनी ज्या-ज्या जिल्ह्यातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे त्या जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आलेले आहे.जिल्हा परिषदेचे मंडणगड तालुक्यातील शिक्षक महावीर सोमनाथ मिसाळ आणि रत्नागिरी तालुक्यातील शिक्षक प्रदीप कृष्णा मोरे व राकेश म्हादू भंडारे या शिक्षकांनी ३० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सेवेत दाखल होण्यासाठी सादर केले होते. या शिक्षकांनी शासनाकडून वाहतूक भत्त्याचा लाभ घेतला आहे. ४० टक्के दिव्यांग असलेल्या कर्मचारी, शिक्षकांना या भत्त्याचा लाभ देता येतो. तरीही निकषात बसत नसतानाही हा लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र पडताळणीनंतर समोर आले. त्यामुळे त्या तिन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Three disabled teachers suspended for improper benefit claims.

Web Summary : Three teachers in Ratnagiri were suspended after an audit revealed they improperly claimed transportation allowances despite not meeting disability criteria. An investigation is underway following orders to verify disability certificates of employees.