रत्नागिरीतील तरुणीला सव्वा लाखाचा ऑनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:14+5:302021-09-15T04:37:14+5:30

रत्नागिरी : कॅशबॅक रिवॉर्डचे आमिष दाखवून एका तरुणीला सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार ...

A young woman from Ratnagiri was robbed of Rs | रत्नागिरीतील तरुणीला सव्वा लाखाचा ऑनलाईन गंडा

रत्नागिरीतील तरुणीला सव्वा लाखाचा ऑनलाईन गंडा

रत्नागिरी : कॅशबॅक रिवॉर्डचे आमिष दाखवून एका तरुणीला सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याचा प्रकार शनिवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याचा कालावधीत रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी येथे घडला. याप्रकरणी नितीनकुमार सिंग नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदिनी लहू निंबरे (२२, रा. वेतोशी खालचीवाडी, रत्नागिरी ) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी त्यांना अज्ञात क्रमांकावरून फोन आला. नितीनकुमार सिंग नावाच्या या व्यक्तीने आपण फोन पे कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. ५ हजार रुपयांचे कॅशबॅक रिवॉर्ड लागले असून त्यासाठी एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास त्याने सांगितले. त्यानंतर ॲप्लिकेशन कोड आणि एटीएम पिन घेऊन त्याने निंबरे यांच्या खात्यातील १ लाख ३३ हजार ९५१ रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, निंबरे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप करत आहेत.

Web Title: A young woman from Ratnagiri was robbed of Rs