Ratnagiri: लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला, धाडसाने प्रतिकार करत जीव वाचवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:36 IST2025-12-02T17:35:02+5:302025-12-02T17:36:41+5:30

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Woman injured in leopard attack at Shivne Sangarewadi in Sangameshwar taluka ratnagiri | Ratnagiri: लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला, धाडसाने प्रतिकार करत जीव वाचवला

Ratnagiri: लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला, धाडसाने प्रतिकार करत जीव वाचवला

सचिन मोहिते

देवरुख : तीन महिला लाकडे आणण्यासाठी गावानजीकच्या जंगलात गेल्या होत्या. त्यातील एक महिला समोर दिसणारी सुकी लाकडे ओढू लागली. ही चाहूल लागताच तेथेच दबा धरून बसलेला बिबट्या समोर उभा राहिला. महिलेची आणि बिबट्याची क्षणभर नजरा नजर झाली आणि एवढ्यातच बिबट्याने जोराने डरकाळी फोडत महिलेवर झेप घेऊन हल्ला केला.

धोक्याची जाणीव झालेल्या महिलेने बिबट्याची झेप चुकवली आणि स्वत:चा प्राण वाचविला. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी येथे मंगळवारी दुपारी घडली. प्राणावर आलेल संकट धाडसाने परतवलेल्या या महिलेचेे नाव साक्षी मंगेश पवार (३८) असून, पायाला बिबट्याची नखे लागून त्या जखमी झाल्या आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील शिवने सनगरेवाडी येथील साक्षी पवार, प्रणिता सनगरे आणि सुप्रिया सनगरे या तिघी लाकडे आणण्यासाठी दत्तमंदिराच्या स्टॉपजवळील जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी लाकडी काढत असताना समोरच्या जाळीतच दबा धरून बसलेल्या बिबट्याने साक्षी यांच्यावर झेप घेतली. आपल्या दिशेने बिबट्या झेप घेत असल्याचे लक्षात घेताच साक्षी यांनी तत्काळ स्वतःला जमिनीवर झोकून दिले. यामुळे बिबट्याची झेप चुकली आणि एका पंजाची नखे साक्षी यांच्या पायाला लागली. त्यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या प्रणिता सनगरे आणि सुप्रिया सनगरे या तिघींनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला.

साक्षी पवार यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले असून, बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचे निर्देश येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या पायाला बिबट्याची चार नखे लागली आहेत. त्या जमिनीवर पडल्यामुळे त्यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. देवरुख वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी साक्षी पवार यांच्या घरी जाऊन त्यांची पाहणी केली.

जर मी स्वतःला जमिनीवर झोकून दिले नसते तर बिबट्याची उडी माझ्या अंगावर आली असती आणि कदाचित याच क्षणी माझी मान बिबट्याच्या जबड्यात आली असती. ही घटना म्हणजे माझ्यासाठी दुसरा जन्मच आहे. - साक्षी पवार, शिवने, ता. संगमेश्वर

Web Title : रत्नागिरी: लकड़ी बीनने गई महिला पर तेंदुए का हमला, बहादुरी से बची

Web Summary : रत्नागिरी में लकड़ी बीनने गई एक महिला पर तेंदुए ने हमला कर दिया। महिला ने बहादुरी से मुकाबला कर अपनी जान बचाई, हालांकि वह घायल हो गई। इस घटना से इलाके में दहशत फैल गई है और स्थानीय लोग वन विभाग से तत्काल कार्रवाई करने का आग्रह कर रहे हैं।

Web Title : Ratnagiri Woman Attacked by Leopard, Bravely Fights Back, Survives

Web Summary : In Ratnagiri, a woman collecting wood was attacked by a leopard. Showing immense bravery, she fought back and survived, though sustaining injuries. The incident has caused fear among locals, who are urging forest officials to take immediate action to prevent further attacks.