शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

Ratnagiri: रायपाटणमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचा खूनच, तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:57 IST

गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याने चोरीच्या कारणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज

राजापूर : रायपाटणमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या ७४ वर्षीय वैशाली शांताराम शेटे यांचा खूनच झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या डोक्यावर जखम होती आणि शरीर काळे पडले होते, यावरून त्यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याने चोरीच्या कारणातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजापूर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, विच्छेदनानंतर वैशाली शेटे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.रायपाटण टक्केवाडीतील वैशाली शेटे यांचा मृतदेह बुधवारी त्यांच्या घरी आढळला. वैशाली शेटे यांच्या डोक्यावर जखम आढळली आहे. त्यांचे शरीर काळे पडले होते. मृतदेहाच्या या प्राथमिक तपासणीनंतर त्यांचा खूनच झाला असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.त्यामुळे अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३चे कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव हे गुरुवारीही रायपाटण येथेच तपासकामी उपस्थित होते. न्याय वैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक लॅब) पथकही गुरुवारी रायपाटणमध्ये दाखल झाले होती.चोरीसाठी खुनाचा अंदाजवैशाली शेटे यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा कानातच होत्या. मात्र, त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन मात्र गायब होती. त्यामुळे चोरीच्या कारणातूनच हा खून झाल्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Woman Found Dead in Raipatan Was Murdered; Investigation Underway

Web Summary : 74-year-old Vaishali Shete was murdered in Raipatan. Injury to her head suggests foul play. A gold chain was missing, indicating robbery. Police have filed a murder case and are investigating the crime scene; forensic teams are assisting.