शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कोयना अवजलच्या पाण्यावर पांढरा तवंग, कोणत्या कंपनीचे सांडपाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:13 IST

आधीही घडला होता असाच प्रकार

चिपळूण : पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलवर गुरुवारी सायंकाळी पांढरा तवंग आला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाणे खडपोली एमआयडीसीतील एखाद्या कंपनीने त्यांचे सांडपाणी या अवजलमध्ये सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र हे पाणी नक्की कोणत्या कंपनीने सोडले, हे सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट झाले नाही.सोशल मीडियावर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे पाणी नक्की कोणी सोडले याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. काहींनी पिंपळी येथे दूरध्वनी करून माहिती घेतली. पिंपळी येथे गुरुवारी सायंकाळी पाण्यावर पांढरा तवंग आल्यानंतर चिपळूण नगर परिषदेच्या पाणी विभागानेही खबरदारीच्या उपायोजना सुरू केल्या.वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे अवजल वाशिष्ठी नदीला मिळते. चिपळूणमध्ये हे पाणी नगर परिषद उचलते आणि नागरिकांना पिण्यासाठी देते. गुरुवारी सायंकाळी आठ वाजता नगर परिषद पाणी उचलणार होते. तत्पूर्वी ही घटना समजल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नगर परिषदेने ते न उचलण्याचा निर्णय घेतला.शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या टाक्यांमध्ये पुरेसे पाणी आहे. ते नागरिकांना दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना भीतीचे कारण नाही. मात्र हा प्रकार मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. याबाबत माहिती देताना नगर परिषदेच्या पाणी विभागाचे प्रमुख रोहित खाडे म्हणाले की, आम्ही हे दूषित पाणी उचलणार नाही. यापूर्वी असा प्रकार घडला होता. त्यानंतर आम्ही सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहोत. वाशिष्टीचे पाणी उचलण्यापूर्वी आम्ही जॅकवेलच्या ठिकाणचे फोटो कर्मचाऱ्यांकडून मागवतो. त्यानंतरच पाणी उचलतो.आधीही घडला होता असाच प्रकारयापूर्वी असा प्रकार घडला होता तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलिसांशी पत्रव्यवहार करून अशाप्रकारे पाणी सोडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना केली होती. कारखानदारांशीही पत्रव्यवहार केला होता. आजचा प्रकार गंभीर आहे. आम्ही आमच्या स्तरावर उपयोजना करत आहोत. हे पाणी अरबी समुद्राला वाहून गेल्यानंतरच वाशिष्टीचे पाणी उचलले जाईल. असे खाडे यांनी सांगितले.