शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

निराधार पुरुषाला जेव्हा कुटुंब सापडते...

By admin | Updated: June 28, 2016 22:55 IST

माहेर संस्थेने घेतला शोध : दोन महिन्यात उपचार करून सोडले घरी

रत्नागिरी : ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे...’ असे म्हटले जाते. याचा प्रत्यय एका बंद चायनीज गाडीशेजारी विव्हळत असलेल्या एका पुरुषाला आला. त्याच्यावर उपचारच नव्हे; तर त्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे काम ‘माहेर’ या संस्थेने केले आणि या पुरुषासाठी गेले काही दिवस विमनस्क असलेल्या कुटुंबात आनंदाचा पाऊस पडला.जानेवारी २०१६मध्ये भाट्ये पुलाजवळ एक निराधार व्यक्ती वाईट अवस्थेत खूप दिवसापासून झोपली असल्याचा निनावी दूरध्वनी माहेर संस्था, रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांना आला. त्यांनी भाट्ये पुलाजवळ जाऊन पाहणी केली असता निराधार व्यक्ती एका बंद असलेल्या चायनीजच्या गाडीमध्ये झोपलेल्या अवस्थेत दिसली. त्यांच्या दोन्ही पायाला भल्या मोठ्या जखमा झाल्या होत्या व त्यांना चालता येत नव्हते. त्यांच्या अंगावर मळलेले कपडे होते. सुनील कांबळे यांनी त्यांची विचारपूस करता त्यानी आपले नाव दीपक जानूबक्षी फुंडे (गोंदिया) असे सांगितले. या निराधार व्यक्तीला औषधोपचार, निवारा, आहार व आसऱ्याची नितांत गरज ओळखून त्याला माहेर निराधार पुरुषांचट वृद्धाश्रम, हातखंबा, रत्नागिरी या संस्थेत दाखल करण्यात आले. तेथे औषधोपचार करण्यात आले. त्यांना खाणे, निवारा, आपुलकी, प्रेम मिळाल्याने त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली व पायाची जखमही तीन महिन्यात बरी झाली. ती व्यक्ती अर्थहिन बडबड करीत असल्याने शासकीय मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे उपचार चालू केले. अल्पावधीत दीपक फुंडे यांच्या मानसिक स्थितीत सुधारणा होऊ लागली. दोन महिन्यांनी त्यांची मानसिक स्थिती सुधारल्यावर आपल्या गावाचे नाव मु. पो. माल्ही, ता. आमगाव, जि. गोंदिया असे सांगितल्यावर माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी या पत्त्यावर पत्रव्यवहार केला.तसेच आमगाव पोलीस ठाण्यालाही कळवण्यात आले. त्यांच्या मदतीने फुंडे यांच्या पत्नी पुष्पा फुंडे या खातरजमा करण्यासाठी रत्नागिरीत माहेर संस्थेत आल्या. दीपक फुंडे हे तिचे पती असल्याचे त्यांनी सांगितले. गेली ३ वर्षे ते मुलीच्या गावी जातो म्हणून बेपत्ता झाले होते. खूप शोध घेतला तरी ते सापडले नव्हते. त्यांची आशा आम्ही सोडून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)फुलले आनंदाचे क्षण...दीपक फुंडे यांना आपले नातेवाईक भेटल्याने खूप आनंद झाला होता. तसेच नातेवाईकांनाही दीपक जिवंत असल्याने व तो सापडल्याने समाधान वाटत होते. एका निराधार व्यक्तीला त्याचे हक्काचे घर मिळाल्याने माहेर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, रुपाली कांबळे, चंद्रकांत शेंबडे, अमित चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.