उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 07:28 IST2022-09-18T07:27:52+5:302022-09-18T07:28:29+5:30

आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता

What has happened in the industry department will be investigated: Industry Minister | उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

उद्याेग खात्यात काय ‘उद्याेग’ झाले, ते शाेधू : उद्योगमंत्री

लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मला उद्याेग खाते कळले न कळले हा पुढचा मुद्दा आहे. मी कधी दुसऱ्यांच्या खात्यात हस्तक्षेप केलेला नाही; पण उद्याेग खात्यामध्ये नक्की काय उद्याेग झाले आहेत, हे मी शाेधून काढणार आहे, असे उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

आदित्य ठाकरे यांनी उद्याेगमंत्र्यांना खातेच कळले नसल्याचा आराेप केला हाेता. त्यावर मंत्री सामंत  म्हणाले की, या खात्यात नक्की काय, काय उद्याेग झाले आहेत ते मी शाेधून काढणार आहे. वेदांता फाॅक्सकाॅन कंपनी यांच्याशी बैठक कधी झाली, काय करार झाला, याची उत्तरे तत्कालीन उद्याेगमंत्र्यांनी दिली पाहिजेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, आशिष शेलार यांच्याकडे काही पुरावे असल्याचे सांगितले आहे. ते माझ्याकडे देतील, तेव्हा पुढे बघू, असेही ते म्हणाले.

Web Title: What has happened in the industry department will be investigated: Industry Minister