शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील पाणीवाटपात फेरबदलाचे संकेत

By admin | Updated: October 24, 2015 00:19 IST

पारंपरिक पाणी वाटपात बदल केला, तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल

पाटण : कोयना धरणात अवघा ७६.८१ टीएमसी पाणीसाठा उरला आहे. उपलब्ध पाणी जूनपर्यंत वापरावे लागणार आहे. यासंदर्भात सांगलीत वरिष्ठ अधीक्षक अभियंत्यांनी महत्त्वपूर्ण बैठक दि. १६ रोजी घेतली होती. या बैठकीत कोयनेतील पाणी वाटपाबाबत फेरबदलाचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविला आहे. सध्याच्या वार्षिक करारानुसार कोयनेतील ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते, तर ३० टीएमसी पाणीसाठा सांगलीकडील शेती, सिंचन व पिण्यासाठी वापरायचे, असा नियम आहे. मात्र, यावर्षी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. पाऊस थांबला असला तरी वीजनिर्मितीचा सपाटा सुरूच आहे. सांगलीकडील पाणी मागणी वाढतच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस एक-एक टीएमसीने घटत आहे. पारंपरिक पाणी वाटपात बदल केला, तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता येईल. यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, याबाबत मोठी गोपनीयता बाळगली जात आहे. पाणी वाटपातील फेरबदलाची लवकर घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा आगामी काळात कसा वापरायचा, यासाठी महत्त्वाचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत मंत्रालय स्तरावर निर्णय होईल. सांगलीतील बैठकीची माहिती ही गोपनीय असून, त्याबाबत काहीही सांगता येणार नाही.- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता कोयना धरण व्यवस्थापन