खेर्डी येथे साचलेल्या पाण्यामध्ये पकडली मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 15:44 IST2017-10-31T15:38:36+5:302017-10-31T15:44:11+5:30
खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. ही मगर मादी जातीची होती. तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती. खेर्डी येथील भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये असलेल्या पाण्यात मगर आढळली.

मगरीला कोणतीही इजा झाली नसल्याची खात्री करुन तिला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
ठळक मुद्देकातळवाडी येथील क्वारीमध्ये असलेल्या पाण्यात मगर मगर मादी जातीची, वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमीअधिवासात सोडून देण्यात आले.
चिपळूण : खेर्डी येथील विनोद भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये मगर आढळली. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला पकडले. ही मगर मादी जातीची होती. तिचे वय १ वर्ष तर लांबी १२५ सेमी. होती.
खेर्डी येथील भुरण यांच्या कातळवाडी येथील क्वारीमध्ये असलेल्या पाण्यात मगर आढळली. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. विभागाचे वनरक्षक रामदास खोत, डी. आर. सुर्वे, सुजित मोरे, संदेश पाटेकर यांनी क्वारीतील पाणी पंपाच्या सहाय्याने पाणी बाहेर काढले व दगडात असलेल्या मगरीला सुरक्षित बाहेर काढले.