शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पुन्हा उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 5:43 PM

 लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याचे घाणेखुंट ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

ठळक मुद्देसीईटीपी नाल्यालगतच उघड्यावर सांडपाणी सोडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनासआजही कारवाई शून्यच, समस्या सुटण्याऐवजी जटील

आवाशी (ता. खेड) ,दि. ११ :  लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले असून, याविरोधात आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याचे सुमारास सीईटीपी नाल्यालगत उघड्यावर सांडपाणी वाहत असल्याचे घाणेखुंट ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

संपूर्णपणे रासायनिक स्वरुपाचे कारखाने असलेल्या लोटे-परशुराम (ता. खेड) औद्योगिक  वसाहतीत अनेक कंपन्यांमध्ये सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करणारे प्लांट कार्यान्वित नाहीत किंवा असले तरी ते सध्या वापरात नाहीत. तसेच कंपन्यांकडून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपीकडून कर आकारण्यात येतो.

बहुधा हा कर वाचवण्यासाठी वा ज्यांच्याकडे असे प्लांट उपलब्ध नाहीत अशा कंपन्यांकडूनच बिनदिक्कतपणे रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. मात्र, या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कधीही एमआयडीसी वा एमपीसीबी करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही समस्या सुटण्याऐवजी जटील होत चालली आहे.

शुक्रवारी सकाळी घाणेखुंट - सुर्वेवाडी येथील भायजाचा पºयात काळे व रसायनमिश्रीत पाणी वाहत असल्याचे सरपंच अंकुश काते, चंदन गवळी, सूरज काते, राजेश चव्हाण, विलास आंब्रे, प्रवीण काते, भूषण काते यांच्या निदर्शनास आले.

पऱ्यापासून हे ग्रामस्थ सीईटीपीलगत असणाऱ्या नाल्याजवळ आले असता, त्यांना पूर्वेकडे असणाऱ्या कंपन्यांच्या दिशेने हे पाणी येत असल्याचे आढळले. त्यानंतर सरपंच अंकुश काते यांनी एमआयडीसी, एमपीसीबी, सीईटीपी व लोटे पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. मात्र, सीईटीपीखेरीज कोणीही हजर झाले नाही.

काही महिन्यांपूर्वी वसाहतीत एमआयडीसीचे सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली एक भरारी पथक पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नेमकी काय पाहणी केली व काय कारवाई केली? केली असेल तर पुन्हा हे प्रकार सुरू कसे? त्यामुळे हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन संबंधित यंत्रणा व कंपन्यांना याचा जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. अधिकारी व कंपन्यांमध्ये असणाऱ्या साट्यालोट्याचाही लवकरच भांडाफोड करु.अंकुश काते, सरपंच

 

मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मंडणगड येथे असून, मला सरपंच काते यांनी घटनेची कल्पना दिली आहे. मात्र, मी तेथे हजर नसल्याने व उपप्रादेशिक अधिकारी देखील मुंबई येथे बैठकीसाठी गेले असून, इतर कोणीही अधिकारी कार्यालयात नाही. त्यामुळे घटनास्थळी येणे शक्य झाले नाही. मात्र, आता पावसाळा संपला असल्याने जे कोणी हे कृत्य करीत आहेत त्यांचा तपास लावणे शक्य असून, उन्हाळा असल्याने ते तपासणे सोपे जाईल. मी शनिवारी घटनास्थळाला भेट देत सत्य शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे घटनेच्या मुळाशी जाणे शक्य होईल.एस. बी. मोरे,प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMIDCएमआयडीसी