शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

..'त्यामुळे' माझ्याच सांगण्यावरुन विक्रांत अजित पवारांना भेटला, भास्कर जाधवांची स्पष्टोक्ती 

By संदीप बांद्रे | Updated: September 23, 2024 11:50 IST

चिपळूण : काही उच्च परंपरा प्रथा या जपायच्या असतात, मीच विक्रांतला सांगितल हाेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सत्कार कर. माझ्याच ...

चिपळूण : काही उच्च परंपरा प्रथा या जपायच्या असतात, मीच विक्रांतला सांगितल हाेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सत्कार कर. माझ्याच सांगण्यावरुन ताे अजित पवारांना भेटला हाेता, अशाी स्पष्टाेक्ती गुहागरचे आमदार तथा उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांनी चिपळूण दाैऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली हाेती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. साेमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चिपळुणात आले असता आमदार भास्कर जाधव यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.आमदार जाधव म्हणाले की, शरद पवार हे माझ्याकरता दैवत आहेत. ११९५ साली मी पहिल्यांदा आमदार झालो त्यानंतर मी कोल्हापूरला गेलो होतो. त्यावेळी १९५२ साली झालेले खासदार रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापूरमध्ये सत्कार केला. त्यावेळी ते म्हणाले हाेते की, माझ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तरी त्याला मी शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो. काही विचार हे मनावर कोरले जातात, काही उच्च परंपरा प्रथा या जपायच्या असतात, जोपासायच्या असतात. त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस आले होते, चंद्रशेखर बावनकुळे आले होते. त्यांचे मी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले होते. मी राष्ट्रवादीत होतो तेव्हा उद्धव ठाकरे गुहागरात आले होते, त्यांचाही मी शाल, श्रीफळ पाठवून सत्कार केला होता.मी ही एक प्रथा ठेवलेली आहे. सर्व तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा काय आहे, ते संस्कार मी माझ्या मुलांवर केले आहेत. मीच सांगितलं विक्रांतला अजितदादांचा सत्कार कर, असे आमदार जाधव म्हणाले. त्याच प्रथेप्रमाणे मी माझा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून शरद पवार यांच्या स्वागताला आलो आहे. माझ्या हृदयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव काेरले आहे तसेच पवार साहेबांचं स्थान अढळ आहे, असे ते म्हणाले. आजच्या सभेला आपण उपस्थित राहणार का, असे विचारले असता आजची सभा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे, असे सांगून अधिक भाष्य करणे टाळले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणguhagar-acगुहागरBhaskar Jadhavभास्कर जाधवAjit Pawarअजित पवार