पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:28 IST2021-04-03T04:28:23+5:302021-04-03T04:28:23+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गट शिवसेनेतर्फे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा ...

Vikrant Jadhav felicitated by Padve group | पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गट शिवसेनेतर्फे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

शाहीर सचिन पवार यांनी पोवाड्यातून अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा गुणगौरव केला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही विक्रांत जाधव यांनी दिली.

तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर, पंचायत समिती सभापती पूर्वी निमूणकर, विनायक मुळ्ये, गुहागर युवासेना तालुकाध्यक्ष अमरदीप परचुरे, चिपळूण युवासेना तालुकाध्यक्ष उमेश खताते, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, सीताराम ठोंबरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रदीप सुर्वे, युवासेना उपजिल्हा अधिकारी सचिन जाधव, जामसूत सरपंच बाबू सावंत, शरद साळवी, बाबा वैद्य, के. बी. उकार्डे, विभागप्रमुख नरेश निमूणकर, आबलोली शाखाप्रमुख संदीप निमूणकर, महिला आघाडी वनिता डिंगणकर, पूजा कारेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेश निमुणकर यांनी केले.

Web Title: Vikrant Jadhav felicitated by Padve group