शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी भारतात टाकाऊ प्रणालीचा वापर

By admin | Updated: July 30, 2014 23:58 IST

वामन मेश्राम : निवडणुकीत ‘गडबड’ करून निवडून येण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप

रत्नागिरी : मतदानासाठी भारतात वापरण्यात येत असलेली इलेक्ट्रॉनिक मशिन्स ही जगात टाकाऊ प्रणाली म्हणून ओळखली जाते. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन्स (इव्हीएम) मध्ये गडबड करून काही नेते जिंकून आल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे (बामसेफ) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांनी रत्नागिरीत झालेल्या राष्ट्रव्यापी महा जन- जागरण अभियानप्रसंगी केले.शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भारत मुक्ती मोर्चातर्फे राष्ट्रव्यापी महा जन-जागरण अभियान राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सद्वारे निवडणूक आयोगाकडून मानव अधिकाराचे उल्लंघन हा या अभियानातील चर्चेचा विषय होता. या अधिवेशनाला बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर, संदीप ढवळ, जिल्हा हज कमिटीचे अध्यक्ष रफीक बिजापुरी, भंडारी समाजाचे अध्यक्ष शरद बोरकर, राष्ट्रीय महिला मूल निवासी संघ, रत्नागिरीच्या अध्यक्ष संगीता शिंदे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश जाधव, शरद मोहिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेश्राम पुढे म्हणाले की, प्रगत देशात कुठेच इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स वापरत नसतानाही अशी टाकाऊ प्रणाली ज्या देशात ७० टक्के लोक अशिक्षीत तसेच अर्धशिक्षित आहेत, अशा देशात वापरण्यामागे त्यात गडबड करून निवडून येणे, हेच मोठे षडयंत्र आहे. लोकशाहीने मतदानाचा हक्क दिला तरी निवडून येण्यासाठी १९५२ पासून सातत्याने जनतेची दिशाभूल होत आरोप मेश्राम यांनी केला. यावेळी त्यांनी या सर्व निवडणुकांबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)