शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

रत्नागिरीतील पानवलकर यांचा प्रयोग, प्लास्टिक वगळता कचऱ्यापासून केले टनभर खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:40 IST

रत्नागिरी येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील मुकुंद पानवलकर यांचा प्रयोग कचऱ्यापासून केले टनभर खतप्लास्टिक वगळता सर्व कचरा

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे. विशेष म्हणजे डॉ. पानवलकर हे गेल्या सहा वर्षांपासून प्लास्टिक वगळून सर्वप्रकारच्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करीत आहेत.लहानपणापासूनच बागकामाची आवड असलेल्या डॉ. पानवलकर यांनी आपल्या घराभोवती बाग तयार केली असून, त्यात विविध प्रकारची फुलझाडे तसेच काही फळझाडेही लावली आहेत. यामध्ये काही विदेशातील दुर्मीळ फुलांचाही समावेश आहे. या बागेला बाहेरून माती किंवा खत न आणता, ते स्वत:च तयार करीत आहेत.

या सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी घरातील कचरा, भाज्यांचे टाकाऊ अवशेष, देठ, पडलेली पाने-फुले, फळांची नको असलेली साले, याचबरोबर वापरलेली चहा पावडर, अंड्याची टरफले, गवत, कागदाचे तुकडे, पुठ्ठे अगदी निर्माल्य आदी वस्तूंचा समावेश त्यांच्या खत निर्मितीत आहे.

नगर परिषदेच्या घंटागाडीतून फक्त प्लास्टिकचा कचराच आम्ही देतो, असे डॉ. पानवलकर सांगतात. खत तयार करण्यासाठी अगदी फुटलेली बादली वा कुंडीचाही वापर ते करतात.आता स्वतंत्र खत निर्मितीसाठी त्यांनी सुमारे तीन फूट उंचीच्या लोखंडी जाळीचा पिंजरा करून घेतला आहे. त्याभोवती नायलॉनची जाळी शिवून घेतली आहे. यात हा सर्व कचरा टाकला जातो. खत तयार होण्यास सुमारे दीड - दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

घरासभोवताली असलेल्या बागेला हे खत वर्षभर पुरते. पानवलकर दाम्पत्याला प्रवासाची प्रचंड आवड असल्याने देश - विदेशातील विविध प्रकारची फुले, फळे यांची रोपे त्यांच्या बागेत दिसून येतात. एवढेच नव्हे तर डॉ. पानवलकर त्यापासून नव्या रोपांची निर्मितीही करतात.वाढदिवसाचे औचित्य साधून किंवा भेट म्हणून ही रोपे देताना त्यांना विलक्षण आनंद होतो. या रोपांची किंमत बाहेर २०० ते ५०० रूपयांपर्यंत असल्याचे ते सांगतात.गुलाबाची आवड असलेल्या पानवलकर दाम्पत्याच्या या बागेत २५ प्रकारच्या गुलाबांची १०० रोपे लावलेली आहेत. आपल्याकडे विदेशातील रोपे जगत नाहीत, असा समज आहे. मात्र, पानवलकर दाम्पत्याने हा समजही खोटा ठरवला आहे.

या बागेत विविध प्रकारची जास्वंद, गुलाब, सदाफुली, जरबेरा बरोबरच अ‍ॅडेनिअम, आर्किडेझ, युफोर्बिया, पेन्टास, इम्पेशन्स, डान्सिंग डॉल आदी परदेशी फुलेही बहरलेली आहेत.त्याचबरोबर घराच्या आवारात १५ नारळाची झाडे त्याचबरोबर फणस, सोनकेळी, लाल केळी, आवळा, लिंब, रायआवळा, पेरू, पेर, अंजीर, ड्रॅगनफ्रूट, विलायती काजू, अननस, बोन्साय चिकू आदी झाडे या दोघांनी स्वत: आपल्याकडील कामगाराला मदतीला घेऊन लावलेली आहेत.बागेत नवीन रोप लावताना त्यासाठी मातीचा वापर करायलाच हवा, असे नाही. डॉ. पानवलकर आपल्या बागेत रोपे लावण्यासाठी नारळापासून तयार केलेले कोको पीठ (ते सध्या केरळहून मागवतात) वापरतात. त्यात नारळाच्या सोडणांचे तुकडे टाकतात. यातूनही चांगल्या प्रकारची रोपे येत असल्याचे डॉ. पानवलकर सांगतात.परसदारी केली बागरत्नागिरीतील ८३ वर्षीय डॉ. पानवलकर तसेच त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता या दोघांनाही बागेत काम करण्याची आवड आहे. स्मिता पानवलकर यांनीही परसदारी छोटीशी बाग केली असून, त्यात विविध फुलांबरोबरच विविध फळबाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या केल्या आहेत. त्यामुळे भाज्या घरच्या घरीच उपलब्ध होतात. त्यांच्या बागेतही त्या सेंद्रीय खताची निर्मिती करीत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlastic banप्लॅस्टिक बंदी